

Pune Gets New Mayor as Manjusha Nagpure Wins Unopposed
Sakal
पुणे: बिनविरोध निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेविका मंजूषा नागपुरे यांची सोमवारी पुण्याच्या महापौरपदीही बिनविरोध निवड झाली. तर, भाजप-रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) परशुराम वाडेकर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. नेत्यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणुकीतून माघार घेतली.