ठाकरे, अजित पवार यांना शहर विकासात रस नाही 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

हडपसर - मुंबईतील सत्ता गेली तर आर्थिक नाड्या आवळल्या जातील, अशी भीती उद्धव ठाकरे यांना वाटते, तर सत्ता जाणार म्हणून अजित पवार दुःखी होत आहेत. मात्र, शहराच्या अथवा जनतेच्या विकासाचे त्यांना काही देणे घेणे नाही, अशी टीका संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केली. 

वानवडी येथे प्रभाग क्र. 25 व 27 मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेत पर्रीकर बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, दिलीप गिरमकर, उज्ज्वल केसकर उपस्थित होते. 

पर्रीकर पुढे म्हणाले, ""केंद्र व राज्यात विकासाचा ध्यास असलेल्या भाजपची सत्ता आहे. पुणेकरांनी भाजपला पुणे शहराची एकहाती सत्ता दिली तर पुण्याच्या विकासात काहीही उणे राहणार नाही, याची मी हमी घेतो. पुणे शहरातील संरक्षण विभागाच्या जागेतील घोरपडी, लुल्लानगर उड्डाण पुलासाठी लागणारी जागा उपलब्ध करून देणे, पुणे विमानतळावर विमानाच्या पूर्वी केवळ 25 फेऱ्या होत, त्या 100 पर्यंत वाढविण्यासाठी मी प्रयत्न केले.'' 

राज्यमंत्री कांबळे म्हणाले, ""पुणे शहरातील उड्डाण पूल हे संशोधनाचा विषय आहे. विकासाच्या नावाखाली केवळ टक्केवारीसाठी हे पूल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी बांधले. महापौरांनी स्मार्टसिटीला विरोध केला. त्यांना विकास नको तर स्वतःचा विकास हवा. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हाती सत्ता दिल्याने जनतेची घोर निराशा झाली. त्यामुळे सुज्ञ जनता महापालिका निवडणुकीत त्यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही.'' 

Web Title: manohar parrikar rally in hadapsar