पुणे : बलात्कार व अट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन डॉक्टरकडुन तब्बल 75 लाख रूपयांची खंडणी उकळणार्या मनोज अडसुळ यास अखेर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथकाने गुरुवारी सकाळी मुंबईतील घाटकोपर येथून अटक केली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
डॉ.दीपक रासने यांनी विश्रामबाग पोलिस ठान्यात अडसुळविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. तर याच प्रकरणात अडसुळ याच्या डॉक्टर भावाने पोलिस मित्र जयेश कासट याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. दरम्यान, अडसुळ याच्याकडुन अटकपूर्व जामीन मिळविन्यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र न्यायालयाने दोन दिवसापूर्वी त्याचा जामिन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे अडसुळ यास अटक होण्याची दाट शक्यता होती.
आश्चर्य ! 'या' प्राण्याला ऑक्सिजनची गरजच नाही !
दरम्यान, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेन्द्र मोहिते व त्यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी त्यास मुंबईतील घाटकोपर येथुन अटक केली. त्यानंतर त्यास पुण्याला आणण्यात आली. गुरुवारी दुपारी त्यास न्यायालयात हजर केले जाणार आहे.
नोबेल हॉस्पिटल उडविण्याची धमकी देण्यामागे 'हे' आहे कारण
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.