पदवीधरच्या निवडणुकीदरम्यान पुण्यात घडले अनेक गंमतीदार किस्से ! 

Many funny stories happened in Pune during the graduate elections
Many funny stories happened in Pune during the graduate elections

पुणे : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कोठे आमदार, नगरसेवकांची नावे मतदारयादीतून गायब झाली तर कोठे कर्वेनगरमधील मतदारांना मतदानासाठी चक्क हडपसरला जावे लागले ! मतदान केंद्रातही मतपत्रिकेच्या घड्या घालून अधिकारी वैतागले, असे अनेक किस्से मंगळवारी पुण्यात घडले ! 

आमदारांचेच नाव गायब !

भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ, त्यांचे बंधू मनोज देशपांडे, भावजय नगरसेविका मानसी आणि दोन मुलांची नावे पदवीधर मतदारसंघाच्या मतदारयादीतून गायब झाल्याचे त्यांना मंगळवारी दिसून आले. या बाबत त्यांनी निवडणूक अधिकाऱयांकडे तक्रार नोंदविली आहे. मिसाळ म्हणाल्या, मतदार नोंदणी करताना मी एकटीने सुमारे 800 पदवीधरांच्या नावांची नोंदणी केली होती. पण माझे आणि माझ्या भावाच्या कुटुंबियांचीच नावे मतदारयादीतून गायब झाली. हा काय प्रकार आहे, आम्ही पदवीधरांची नावे मतदारयादीत म्हणून प्रयत्न केले अन आमचीच नावे यादीत नाहीत, हा हास्यास्पद प्रकार आहे. 

कर्वेनगरमध्ये राहणाऱया सुनील चिकटे आणि त्यांची पत्नी अनघा यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारयादीत नावे समाविष्ट करण्यासाठी नोंदणी केली. परंतु, त्यांना मतदानाच्या आधी दोन दिवस आलेल्या  मेसेजमुळे ते आश्चर्यचकीतच झाले. कारण सुनील यांचे हडपसरमध्ये तर, अनघा यांचे नाव कर्वेनगरमध्ये आले. एेनवेळी काही करता येणार नाही, असे निवडणूक कर्मचाऱयांनी सांगितले. तरीही हार न मानता सुनील यांनी वयाच्या 60 व्या वर्षी मंगळवारी कर्वेनगरहून हडपसरला जावून मतदानाचा हक्क बजावला. 

आळंदीमध्ये 10 दिवस संचारबंदी? राज्य शासनाला पाठविला प्रस्ताव

घडी घालून अधिकारी वैतागले !

पदवीधरसाठी तब्बल 62 उमेदवार निवडणूक रिंगणा्त होते. त्यामुळे मतपत्रिका लांबलचक झाली होती. मतदान झाल्यावर मतपत्रिकेची घडी घालून ती बॉक्समध्ये घालताना मतदारांची गडबड होत होती. जवळपास प्रत्येक मतदाराच्या मतपत्रिकेची विशिष्ट पद्धतीने घडी मतदान केंद्रातील अधिकाऱयाला घालावी लागत होती. बिबवेवाडीतील हुतात्मा बाबू गेनू शाळेतील अधिकारी त्यामुळे वैतागले होते. मतपत्रिकेची घडी कितीवेळा घालून दाखवायची, असे ते म्हणत होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com