esakal | पुण्यात फ्लॅट, रुम्स शोधताय? फेसबुकवरील 'या' ग्रुपची तुम्हाला होईल मदत
sakal

बोलून बातमी शोधा

House_Flats

विद्यार्थी आणि कुटुंबांना घर मिळावे, यासाठी सध्या अनेक ग्रुप कार्यरत आहेत. घर भाड्याने घेणाऱ्या व्यक्तीस कोणालाही कमिशन द्यावे लागू नये, अशी खबरदारी याठिकाणी घेतली जात आहे.

पुण्यात फ्लॅट, रुम्स शोधताय? फेसबुकवरील 'या' ग्रुपची तुम्हाला होईल मदत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : भाडेतत्त्वावर किंवा विकत घर घ्यायचे असेल, तर त्यासाठी शोधाशोध ही दमवून टाकणारी असते. आपल्याला अपेक्षित असलेल्या परिसरात नेमक्‍या कोणत्या ठिकाणी भाड्याने घरं उपलब्ध आहेत, याची सर्व माहिती नसल्याने बऱ्याचदा एजंटांचा आधार घेतला जातो. संबंधित घराचा भाडेकरार झाल्यानंतर एंजटला एक महिन्याचे घरभाडे द्यावे लागते. मात्र ही सर्व उठाठेव कमी करून एजंटविना घराच्या शोधात असलेल्या अनेकांना फेसबुकवर असलेल्या ग्रुपचा आधार मिळत आहे.

प्रशासक नियुक्तीच्या चक्रव्यूहात अडकलं राज्य सरकार; कोण भेदणार हे चक्रव्यूह?​

विद्यार्थी आणि कुटुंबांना घर मिळावे, यासाठी सध्या अनेक ग्रुप कार्यरत आहेत. घर भाड्याने घेणाऱ्या व्यक्तीस कोणालाही कमिशन द्यावे लागू नये, अशी खबरदारी याठिकाणी घेतली जात आहे. त्या ठिकाणी करण्यात आलेल्या पोस्ट या बऱ्याचदा घर मालकांकडूनच केलेल्या असतात. त्यामुळे संबंधित घर भाड्यावर घेणाऱ्यांची आपोआपच कमिशनची बचत होते. घर भाड्यावर घेण्यासाठी सध्या अनेक संकेतस्थळे आहेत. मात्र त्यासाठी पैसे मोजावे लागत असल्याने किंवा काही ठराविक घरांचीच मोफत चौकशी करता येत असल्याने अनेक नागरिक हा पर्याय पसंत करीत आहेत.

डॉक्टरांनी ‘शस्त्र’ खाली ठेवयाची का? राज्यातील डॉक्टरांच्या संघटनांचा संतप्त सवाल​

फेसबूकवरील एका ग्रुपवरून घर भाड्याने मिळालेले अभिजित पाटील यांनी याबाबत सांगितले की, 'मी गेल्या काही दिवसांपासून माझ्या कुटुंबासाठी घर शोधत होतो. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमुळे एजंटला प्रत्यक्ष भेटून घर भाड्याने घेणे सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. भाड्याने घर मिळण्याबाबत फेसबूकवर असलेल्या एका ग्रुपला मी जॉईन आहे. तेथे एका घर मालकाने त्यांचे घर भाड्याने देण्याबाबतची पोस्ट केली होती. त्यानुसार संबंधिताला मी फोन केला आणि कोणतेही कमिशन न देता मला घर मिळाले.'  

शेतकऱ्यांनो, पीक विमा योजनेबाबत कृषी आयुक्तालयाने जाहीर केली महत्त्वाची सूचना​

विद्यार्थी व नोकरदारांना होतेय फायदा :
कुटुंबापेक्षा विद्यार्थी आणि नोकरदारांसाठी घर शोधणे मुश्‍कील असते. मात्र या दोघांनाही अशा ग्रुपचा चांगला फायदा होत आहे. भाडेतत्त्वार घेतलेल्या सदनिकेत एखाद्या व्यक्तीसाठी जागा असेल, तर त्याबाबतच्या अनेक पोस्ट या ग्रुपमध्ये टाकण्यात येतात. 

हे आहेत ग्रुप :
- फ्लॅट ऑन रेंट (पुणे)
- फ्लॅट विदाउट ब्रोकर
- फ्लॅट ऍन्ड फ्लॅटमेन्ट्‌स
- पुणे रेंटल अपार्टमेंट

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top