‘स्कूलिंपिक्‍स’चा थरार रंगणार

Schoolympics
Schoolympics

पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे चार हंगामांच्या भरघोस यशानंतर पुन्हा एकदा ‘मॅप्रो स्कूलिंपिक्‍स’ आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. यात शहर व जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना क्रीडाकौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेसाठी शाळांची नोंदणी ऑनलाइन होणार असून, ही प्रक्रिया येत्या १ ऑगस्टपासून सुरू होईल. आगामी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये या स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळणार आहे.

या स्पर्धेचा यंदा पाचवा हंगाम असून, यात २२ क्रीडा प्रकारांत ७ सांघिक आणि १५ वैयक्तिक क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. सांघिक गटातील स्पर्धा १० ते १६ वर्षे वयोगटातील मुले आणि मुलींसाठी असतील. वैयक्तिक क्रीडा प्रकारांत १० ते १२, १२ ते १४ आणि १४ ते १६ हे तीन वयोगट असणार आहेत.

सांघिक क्रीडा प्रकारांत बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल या स्पर्धांचा समावेश असून बॅडमिंटन, बॉक्‍सिंग, जिम्नॅस्टिक्‍स, ज्यूदो, तायक्वांदो, ॲथलेटिक्‍स, स्केटिंग, टेनिस, स्वीमिंग, टेबल टेनिस, कुस्ती, नेमबाजी, धनुर्विद्या, बुद्धिबळ आणि सायकलिंग अशा वैयक्तिक क्रीडा प्रकारातील ४०९हून अधिक स्पर्धांच्या फेऱ्या होणार आहेत. 

या स्पर्धेतून २२९१ पदके (७१४ सुवर्ण, ७१४ रजत आणि ८६३ कांस्य) पटकावण्याची संधी स्पर्धकांना असणार आहे. स्पर्धेमध्ये अधिकाधिक शाळांनी सहभागी होण्यासाठी गुणांच्या आधारावर पदकतालिका असणार आहे. सांघिक क्रीडा प्रकारांत सुवर्णपदक मिळविणाऱ्या संघाला १५ गुण, रौप्यपदक मिळविणाऱ्या संघाला ९ आणि कांस्यपदक मिळविणाऱ्या संघाला ३ मिळणार आहेत. तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारांत सुवर्णपदक मिळविणाऱ्या खेळाडूला ५ गुण, रौप्यपदक मिळविणाऱ्या खेळाडूला ३ आणि ब्राँझपदक मिळविणाऱ्या खेळाडूला १ मिळणार आहेत. सर्वाधिक गुण मिळविणारी शाळा रोख बक्षिसे आणि चषक जिंकू शकणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com