Maratha Free Matrimonial Meet : मराठा मोफत वधू-वर परिचय स्नेहमेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७६४ वधू-वरांचा सहभाग

जुन्नर तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा समाजातील मोफत वधू-वर परिचय स्नेहमेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Maratha Free Matrimonial Meet Receives Overwhelming Response 764 Brides and Grooms Participate
Maratha Free Matrimonial Meet Receives Overwhelming Response 764 Brides and Grooms ParticipateSakal

जुन्नर : जुन्नर तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा समाजातील मोफत वधू-वर परिचय स्नेहमेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात ७६४ वधु-वर व पालकांनी सहभाग घेतला. यात ४८६ मुले व २७८ मुलींचा सहभाग होता अशी माहिती तालुकाध्यक्ष गणेश महाबरे व मुख्य आयोजक प्रकाश सदाकाळ व भारती फुगे यांनी दिली.

मोशी येथील जय गणेश लॉन्स येथे रविवार ता. १० रोजी झालेल्या मेळाव्यास पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, हवेली, बारामती, खेड, शिरूर, मुळशी, मावळ ह्या तालुक्यातील तसेच पिंपरी-चिंचवड, भोसरी येथील मराठा समाजाचे वधु-वर व पालक सहभागी झाले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या प्रा. संध्या वाळूज, सोनिया पराड मराठा सेवा संघाचे संदेश बारवे, मंदार बुट्टे पाटील, अॅड. सिद्धेश ढोले व कार्यकर्ते उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष अतिश बारणे पाटील, सामाजिक कार्यकर्ते गणेश सस्ते पाटील, राम सासवडे, निवृत्त पोलीस अधिकारी शंकरराव कोंढरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून तसेच प्रातिनिधिक स्वरूपात वधू-वर परिचय पत्र स्वीकारून मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला.

पहिल्या सत्रात वधू-वर नोंदणी व दुसऱ्या सत्रात वधू-वरांनी आपला परिचय करून दिला. मेळाव्याच्या माध्यमातून दोन विवाह जवळपास निश्चित झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. वधू-वर मेळावे ही काळाची गरज असून

ह्या मेळाव्यात ज्या मुलींचा विवाह निश्चित होईल त्यानी येत्या मे महिन्यात मराठा समाजातील गरीब कुटुंबातील २५ मुलींच्या मोफत विवाह सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष अतिश बारणे पाटील यांनी उदघाटन प्रसंगी केले. मेळाव्याचे संयोजन प्रकाश सदाकाळ, भारती फुगे व दत्ता म्हसकर यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com