सकल मराठा समाजाच्या बंदला भिगवणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रशांत चवरे
मंगळवार, 24 जुलै 2018

भिगवण (पुणे) : सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला येथील व्यावसायिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. मराठा समाजाच्या मागणीस विविध सामाजिक व राजकिय संघटनानीही पाठिंबा व्यक्त करत मंगळवारी (ता.24) सकाळी मोर्चा काढुन पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले.

बंदबाबतची माहिती व्यावसायिकांनी आधीच मिळाल्यामुळे मंगळवारी (ता.24) बहुतेक व्यावसायिकांनी आपले व्यावसाय बंद ठेवले होते. अत्यावश्यक सेवा वगळता जवळपास शंभर टक्के व्यावयास बंद ठेवण्यात आले होते. बंदमुळे येथील व्यापारी पेठेमध्ये शुकशुकाट होता.

सकाळी नऊच्या सुमारास सकल मराठा समाज, आर.पी.आय.सेना व विविध राजकिय, समाजिक संघटनांच्या वतीने येथे मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलन कर्त्यांनी मागण्याचे निवोदन सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांचेकडे सुपूर्द केले.

Web Title: maratha kranti morcha bhigwan strike