esakal | मराठा नेते हे समाजाचे नाही, तर ते फक्त राजकीय पक्षांचे आहेत!
sakal

बोलून बातमी शोधा

Maratha_Kranti_Morcha

25 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, पण 'ईडब्ल्यूएस' आरक्षण देऊन त्यांनी वैध असलेल्या 'एसईबीसी' आरक्षणाचा खून केला आहे.

मराठा नेते हे समाजाचे नाही, तर ते फक्त राजकीय पक्षांचे आहेत!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ''मराठा समाजाला 'एसईबीसी'मधूनच आरक्षण हवे आहे, पण मागणी नसतानाही आम्हाला 'ईडब्ल्यूएस'मधून आरक्षण देऊन महाविकास आघाडी सरकारने आमची फसवणूक केली आहे. हा एकप्रकारे 'एसईबीसी' आरक्षणाचा खूनच आहे, आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चातर्फे शनिवारी (ता. 26) पत्रकार परिषदेत केला.

नववर्षाच्या पहिल्या आठवड्यातच पुण्यात संचारबंदीसह जमावबंदीही!

पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत मराठा सेवा संघाचे राजेंद्र कुंजीर, संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर, आरक्षणाचे अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे, राष्ट्रसेवा समूहाचे राहुल पोकळे, मराठा महासंघाचे अनिल मारणे, उत्तम कामठे आदी उपस्थित होते.

कोकाटे म्हणाले, 25 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, पण 'ईडब्ल्यूएस' आरक्षण देऊन त्यांनी वैध असलेल्या 'एसईबीसी' आरक्षणाचा खून केला आहे. 'इडब्ल्यूएस' केवळ मराठा समाज नाही, तर एसटी, एससी, ओबीसी वगळून सर्वजण या आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात. मागणी नसताना हे आरक्षण देऊन खूप मोठी फसवणूक केली आहे.''

'एक म्हणे पुन्हा येईन तर दुसरा म्हणे परत जाईन, पण बोलवलं कुणी'​

पासलकर म्हणाले, ''मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या बैठकीत सुपर न्यूमररी (अधिसंख्येच्या आधारे) पद्धतीने आरक्षण देण्याचे मान्य केले होते. मात्र, दीड महिन्यात असे काय झाले, त्यामुळे आमची मागणी नसताना 'इएसडब्ल्यू'मधून आरक्षण दिले. यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला असून, राज्य सरकारवर विशिष्ट वर्गाचा दबाव असल्यानेच हा निर्णय घेतला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीमध्ये आम्ही मराठा समाजाची भक्कम बाजू मांडू. आमच्या 42 बांधवांचे बलिदान वाया जाऊ दिले जाणार नाही.

''जर आम्हाला ईडब्ल्यूएस' आरक्षण हवे होते, तर गेल्या 30 वर्षापासून लढा सुरू ठेवला असता? ईडब्ल्यूएसच्या निकषांमध्ये मराठा समाज बसत नाही, त्यामुळे हा निर्णय अन्यायकारक आहे. याचा परिणाम सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर झाला तर मराठा समाज यापुढे शांततेत मोर्चे काढणार नाही,'' असा इशारा राहुल पोकळे यांनी दिला.

पुणे-सोलापूर हाय-वेवर धावत्या ट्रॅव्हल्स घेतला पेट; जिवीतहानी नाही​

विजय वडेट्टीवारांकडून मंत्रिपदाचा गैरवापर
विजय वडेट्टीवार हे संपूर्ण राज्याचे मंत्री आहे, पण ते एकाच समाजाबद्दल भूमिका मांडून मंत्रिपदाचा गैरवापर करत आहेत. ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण करत आहेत. वडेट्टीवार यांची भूमिका राज्य सरकारची भूमिका आहे का हे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाने केली. तसेच, 'मराठा समाजाची भूमिका लावून धरली तर आपल्याला मते मिळणार नाहीत असा न्यूनगंड मराठा नेत्यांना आहे. तसेच मराठा नेते हे समाजाचे नाहीत, तर ते केवळ राजकीय पक्षांचे आहेत, असा आरोप पोकळे यांनी केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top