Maratha Kranti Morcha : आळंदीत महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद

Maratha Kranti Morcha : Responding to the call of  maharashtra bandh in Alandi
Maratha Kranti Morcha : Responding to the call of maharashtra bandh in Alandi

आळंदी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदच्या हाकेला आज आळंदीत आणि परिसरात उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. आळंदीत शंभर टक्के बंद पाळून दुकाने आणि दैनिंदिन व्यवहार बंद ठेवल्याने शहरात आज दिवसभर शुकशुकाट होता. तर मरकळ, धानोरे औद्योगिक विभागात कारखाने बंद ठेवण्यात आले होते.

दरम्यान बंद बाबतचे आवाहन करण्यात आल्यानंतर आज सकाळी शहरात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. महाद्वार, चाकणचौक, पालिका चौक, प्रदक्षिणा रस्ता, मरकळ रस्ता, देहूफाटा याठिकाणी दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले. शहरातील व्यापाऱ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली होती. दरम्यान मराठा आंदोलकांच्यावतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन केले. दुपारी दिड वाजेपर्यंत ठिय्या आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग दाखविला.

मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, प्रशांत कुऱ्हाडे, माजी नगरसेवक डी.डी. भोसले, संदिप नाईकरे, उत्तम गोगावले, भागवत शेजवळ, सागर रानवडे, प्रदिप बवले, राजेंद्र घुंडरे, प्रियेश रानवडे, अविनाश गुळुंजकर, विलास कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, पुष्पा कुऱ्हाडे, संजय नाईकवडी, कालिदास तापकीर, रामदास दाभाडे, रमेश गोगावले, निलेश दिघे, शशि राजे, निलेश विर यांच्यासह शेकडो आळंदीकरांनी पालिका चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन करून बंद पाळला.

यावेळी आळंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक दत्तात्रय दराडे आणि महसूल खात्याच्यावतीने नायब तहसिलदार बीबी घोडके, मंडलाधिकारी चेतन चासकर यांनी आंदोलकांचे निवेदन स्विकारले. 
दरम्यान चऱ्होलीतील शंभरहून अधिक दुचाकीस्वारांनी शहरात दुचाकीवरून फेरी मारून मराठा आरक्षणाची मागणी केली.

महाराष्ट बंद मुळे आळंदीत दुकाने बंद होती. यामुळे देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी आळंदी देवस्थानच्यावतीने दिवसभर मोफत खिचडी आणि चहाचे वाटप भाविकांना करण्यात आले. देवस्थानने खिचडी आणि चहाची सोय केल्याने अनेक भाविकांनी देवस्थानचे आभार मानले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com