रायगड बलात्कार-खून प्रकरण : 'नाहीतर मंत्रालयाला घेराव घालू'; मराठा संघटनांनी दिला इशारा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 August 2020

नगरमधील कोपर्डी येथील घटनेपाठोपाठ तांबडीतील घटनेच्या तपासाबाबतही सरकार आणि पोलिस दिरंगाई करत आहे.

पुणे : रायगडमधील (Raigad) अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि खुनाच्या (Rape and Murder Case) प्रकरणाबाबत सरकार तसेच पोलिस दिरंगाई करीत आहेत. मुख्य आरोपीला त्वरित अटक न केल्यास मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा मराठा संघटनांनी बुधवारी (ता.१४) पत्रकार परिषदेत दिला.

कोरोनाबाधित रुग्णांबाबत उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले निर्देश, म्हणाले...​

रायगडमधील रोहा तालुक्यात असलेल्या तांबडी या गावातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याची घटना २६ जुलै रोजी घडली होती. या घटनेस दोन आठवडे उलटले तरीही मुख्य आरोपीस अद्याप अटक न झाल्याने मराठा संघटना संतप्त झाल्या. शुक्रवारी शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष आणि मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संभाजीराजे दहातोंडे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, परशुराम कासोळे आदी उपस्थित होते. 

Independence Day 2020: देशाटनातून मातीशी नातं घट्ट करणारा कर्नल!

नगरमधील कोपर्डी येथील घटनेपाठोपाठ तांबडीतील घटनेच्या तपासाबाबतही सरकार आणि पोलिस दिरंगाई करत आहे. या प्रकरणाचा जलदगतीने तपास करुन मुख्य आरोपीस अटक करावी, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे. त्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी आणि अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या घटनेइतकेच अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपी शोधण्यास प्राधान्य देण्याची मागणी दहातोंडे यांनी केली आहे. तसेच मागण्याकडे दुर्लक्ष केल्यास १८ ऑगस्ट रोजी अखिल भारतीय मराठा महासंघ आणि मराठा क्रांती मोर्चातर्फे मंत्रालयास घेराव घालण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

कोरोनाच्या तडाख्यातून सावरतेय ऑटो इंडस्ट्री; वाहन खरेदीचा वेग वाढला

संभाजीराजे दहातोंडे म्हणाले, "कोपर्डी बलात्कार प्रकरणातील नराधमांना फाशी होण्यात दिरंगाई होत आहे. त्यामुळे एकापाठोपाठ अशा घटना घडताहेत. तांबडी येथील नववीत शिकणाऱ्या मुलीवर झालेली बलात्कार आणि हत्येची घटना संतापजनक आहे. ही मुलगी उत्तम खेळाडू होती. तसेच ती विद्यमान सरपंचांची मुलगी होती. मात्र, गेल्या १५ दिवसांत मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री यांनी नेमकी काय कारवाई केली किंवा त्या कुटुंबाला भेटून सांत्वन केले का, असा आमचा सवाल आहे. अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या तपासाला जसे प्राधान्य दिले जात आहे, तसेच प्राधान्य महाराष्ट्राच्या या कन्येला न्याय मिळवून देण्यासाठी द्यावे."

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha organizations demanded immediate arrest of accused in rape and murder of minor girl in Raigad