Maratha Reservation : बेलवाडीमध्ये सरकारची प्रतिकात्मक प्रेत यात्रा व अंत्यविधी; शेकडो ग्रामस्थांची हजेरी

सरकार जाणीवपूर्वक मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दिरंगाई करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करुन आज बेलवाडी मधील नागरिकांनी सरकारची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून सरकारच्या धोरणाचा निषेध केला.
Maratha Reservation Agitation
Maratha Reservation Agitationsakal

वालचंदनगर - मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार दिरंगाई करीत करुन सरकार मेले आहे काय? असा आरोप करुन बेलवाडी (ता. इंदापूर) येथे मराठा समाजाच्या नागरिकांनी सरकारची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून सरकारचा निषेध करीत प्रतिकात्मक प्रेताचा अंत्यविधी केला.

अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषण करीत आहेत. सरकार जाणीवपूर्वक मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दिरंगाई करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करुन आज मंगळवार (ता. ३१) रोजी बेलवाडी मधील नागरिकांनी सरकारची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून सरकारच्या धोरणाचा निषेध केला.

तसेच प्रतिकात्मक प्रेत यात्रेची प्रतिकात्मक अंत्यविधीमध्ये रुपांतर करुन प्रतिकात्मक प्रेताचा अंत्यविधी करण्यात आला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ व गुणरत्न सदावर्ते यांचा ही निषेध करण्यात आला.

बेलवाडीमध्ये २४ तास साखळी उपोषण सुरु होते. उपोषणामध्ये महिलांचा उस्फूर्त सहभाग घेतला. आजपासुन मंगळवार (ता. ३१) पासुन प्रवीण शेळके, संजय गेणू पवार, आकाश पवार यांनी आमरण उपोषणास सुरवात केली. बेलवाडी मधील ग्रामस्थांनी सोमवार (ता. ३०) रोजी बारामती-इंदापूर राज्यमार्गावर रास्तारोको आंदोलन करुन मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com