Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी धायरी ग्रामस्थांचा विराट मशाल मोर्चा

सकल मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मराठा बांधवांच्या वतीने मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळत आहे.
Maratha Reservation dhayari
Maratha Reservation dhayarisakal

धायरी - सकल मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मराठा बांधवांच्या वतीने मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळत आहे. मराठा समाजाच्या बरोबरीने इतर समाज बांधव देखील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपला पाठींबा दर्शवित आहेत.

धायरी ग्रामस्थांच्या वतीने मराठा आरक्षणासाठी विराट मशाल मोर्चा काढण्यात आला. धायरी फाटा ते काळभैरवनाथ मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात पाच ते सहा हजार महिलांसह पुरुषांनी सहभाग घेतला.

यावेळी 'एक मराठा लाख मराठा', 'आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं',' तुमचं आमचं नातं काय ,जय जिजाऊ जय शिवराय', 'जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है 'इत्यादी घोषणा देत होते.

सिंहगड रस्ता परिसरातील धायरी फाटा येथून सायंकाळी सहा वाजता सुरुवात करून ,समारोप भैरवनाथ मंदिर येथे करण्यात आला. धायरी येथील सर्व समाज बांधवांनी मशाल मोर्चाला मोठा पाठींबा दिला.

यावेळी सिंहगड रस्ता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com