Maratha Reservation : पुण्यातील मुस्लिम युवकांनी जपला बंधुभाव; दिवसभर उभं राहून केली माराठ्यांची सेवा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भावना मनामध्ये ठेवून, गोखलेनगर येथील दोन युवकांनी आपापल्या परीने मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मराठा समाजातील पदयात्रेकरूंची मनोभावे सेवा केली.
Muslim Youth
Muslim YouthSakal

शिवाजीनगर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भावना मनामध्ये ठेवून, गोखलेनगर येथील दोन युवकांनी आपापल्या परीने मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मराठा समाजातील पदयात्रेकरूंची मनोभावे सेवा केली. पुण्यातील गोखलेनगर परिसरात राहणारे बाबा सय्यद हे हातामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला भगवा ध्वज घेऊन, एकच मिशन मराठा आरक्षण अशा घोषणा देताना उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.

सय्यद यांनी सांगितले, 'छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची लढाई लढत होते, तेव्हा मुस्लिम मावळे देखील त्यांच्या सोबत होते. तसंच आजचा मुस्लिम समाज मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहे. काल रात्रीपासून आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून आमच्या तयारीला लागलो आहोत. 'औंध मुस्लिम जमात ट्रस्ट' च्या माध्यमातून जेवण, पाण्याची सोय करण्यात आली आहे.

मुस्लिम समाज कायम मराठा समाजाच्या पाठीशी उभं राहिला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मुस्लिम समाज मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून सोबत असेल. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराला घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत.

'मराठा समाजातील पदयात्रेकरूंची सेवा करण्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून संचेती हॉस्पिटल चौकामध्ये उभा आहे. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मनिष आनंद यांच्या सोबत सकाळपासून पाणी वाटप करणे , अल्पोपहार वाटप करण्याचे काम करत आहे. मराठा समाजाला शैक्षणिक, नोकरीच्या दृष्टीने आरक्षणाची खूप गरज आहे. मराठा आरक्षणाला मुस्लिम मावळा म्हणून पूर्ण पाठिंबा आहे ‌.सर्वांच मराठा बांधव आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत.

- समद शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com