पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईतील आझाद मैदानावर पाच दिवस आमरण उपोषण केलं. “मराठा आणि कुणबी एकच आहेत, त्यांचा ओबीसी आरक्षणात समावेश व्हावा” ही या आंदोलनाची प्रमुख मागणी होती. त्यासोबतच सातारा, औंध संस्थान तसेच हैद्राबाद गॅझेटिअरची (Hyderabad Gazetteer) अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आली होती.