Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग वाढतोय

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची व्याप्ती गावापर्यत मर्यादित न राहता वाड्यावस्तीपर्यंत पोहचू लागली आहे.
Maratha Reservation Agitation
Maratha Reservation Agitationsakal

वालचंदनगर - एक मराठा... लाख मराठा... आरक्षण आमच्या हक्काचे... नाही कुणाचे बापाचे... आरक्षण मिळालेच पाहिजे... आरक्षण मिळाचे पाहिजे.... या घोषणा आत्ता फक्त मराठा समाजातील पुरुष देत नाहीत... तर खेड्यापाड्यातील वाड्यावस्तीवरील महिलाही देवू लागल्या आहेत.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची व्याप्ती गावापर्यत मर्यादित न राहता वाड्यावस्तीपर्यंत पोहचू लागली आहे. गावोगावी निघणारे कॅडल मार्च आत्ता वाड्यावस्तीपर्यत निघत असून आंदोलनामध्ये प्रत्येक कुंटूबाती महिला ही उत्सफुर्तपणे सहभागी होवू लागल्या आहेत.

यापूर्वीची आंदोलने ही गावाच्या चौकात होत होती. मात्र सध्या सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाची जनजागृती ग्रामीण भागापर्यंत केली. मनोज जरांगे-पाटील हे वाड्या वस्तीवरील महिला, मुले, मुली चे ऑयडाॅल बनले आहेत.

गावातच नव्हे तर वाड्यावस्तीवरील विशेष:ता महिला जागृत झाल्या आहेत. आमच्या पोरांना जास्त मार्क मिळून चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही. नोकरी मिळत नाही. आमच्या पोरापेक्षा कमी गुण असणाऱ्या मात्र प्रवेश मिळतो. नोकरी मिळते याची खंत ही ग्रामीण भागातील वाड्यावस्तीवरील महिला बोलून दाखवू लागल्या असून आरक्षण मिळाल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे ठणकावून सांगत आहेत.

इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावच्या हद्दीतील गावापासुन सहा- सात किलोमिटर लांब असलेल्या बंबाडवाडी, नलवडे वस्ती,साळुंखे वस्ती, थोरात वस्ती वरील महिलांनी पुढाकार घेवून मराठा आरक्षणासाठी मंगळवारी (ता. १) रोजी कॅडल मार्च काढून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली.

कुठल्याही आंदोलनामध्ये सहभागी न होणाऱ्या महिला आत्ता आंदोलनामध्ये सहभागी होवून आरक्षणासाठी आवाज उठवू लागल्या असून याची दखल सरकारने घेणे गरजेचे असल्याचे महिला सांगत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com