ढोबळेंना स्वीकृत सदस्यपदी संधी न दिल्याने मराठा समाज नाराज 

दत्ता म्हसकर
गुरुवार, 5 एप्रिल 2018

जुन्नर- जुन्नर नगर पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुनील ढोबळे यांना संधी न दिल्याने मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे. मागील महिन्यात राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक नितीन गांधी यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर माजिद सय्यद यांची निवड करण्यात आली आहे. 

जुन्नर- जुन्नर नगर पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुनील ढोबळे यांना संधी न दिल्याने मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे. मागील महिन्यात राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक नितीन गांधी यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर माजिद सय्यद यांची निवड करण्यात आली आहे. 

दरम्यान स्वीकृत नगर सेवकाच्या स्पर्धेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच मागील निवडणुकीत अवघ्या दोन मतांनी पराभवाचा फटका बसलेले, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सुनील ढोबळे यांना पुन्हा एकदा पक्षाने स्वीकृत नगरसेवक पदापासून वंचित ठेवल्याने सुनील ढोबळे समर्थक व मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगे च्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जुन्नर नगर पालिकेत संख्या बळानुसार प्रत्येकी एक सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षांचे आहेत. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वीकृत सदस्य नितिन गांधी यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन स्वीकृत सदस्यासाठी सुनील ढोबळे, अब्दुल माजिद सय्यद, रउफखान पठाण, नवरोज सय्यद, संदीप घोणे, अरुण भगत या सहा इच्छुकांनी  जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सभा सुरू झाल्यावर गटनेते दिनेश दुबे यांनी पक्षनेते अतुल बेनके यांचे सूचनेनुसार सय्यद अब्दुल माजिद सय्यद यांचे नाव राष्ट्रवादी कडुन निश्चित करण्यात आले असल्याचे पत्र दिल्यानंतर सय्यद यांची बिनविरोध निवड झाली.   

दरम्यान, सुनील ढोबळे यांची नाराजी नक्की भोवणार कुणाला याबाबत शहरातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहे. तर सुनील ढोबळे यांच्या माध्यमातून मराठा समाजाला नगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व मिळेल अशी अपेक्षा असलेल्या कार्यकर्त्यांची मात्र घोर निराशा झाली आहे. यापुढील काळात संभाजी ब्रिगेडचेच कार्य करत राहणार असून, मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सुनील ढोबळे यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Maratha society is upset with not giving an opportunity to dhoble as an approved member