#MarathaKrantiMorcha शांततेत आंदोलन केल्यास प्रशासनाचे सहकार्य 

दत्ता म्हसकर
मंगळवार, 31 जुलै 2018

जुन्नर-  मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलने केल्यास पोलीस व महसूल प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहील मात्र उद्रेग केल्यास कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिला आहे.

जुन्नर-  मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलने केल्यास पोलीस व महसूल प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहील मात्र उद्रेग केल्यास कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिला आहे.

सकल मराठा समाजाचे पुणे जिल्हा समन्वयक रमेश हांडे यांनी ही माहिती दिली. आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी ता.1 रोजी जुन्नर तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज नारायणगाव येथे अधिकारी, पदाधिकारी, पोलिस पाटील व मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री पाटील यांनी बोलताना वरील इशारा दिला. आमदार शरद सोनावणे, उपविभागीय अधिकारी अजय पाटील, तहसीलदार किरण काकडे, जुन्नर, नारायणगाव, ओतूर, आळेफाटा येथील पोलिस ठाण्याचे अधिकारी, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सुनील ढोबळे, नारायणगावचे सरपंच बाबू पाटे, अमित बेनके, रमेश हांडे, संतोष नाना खैरे, अजिंक्य घोलप, तसेच कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

बुधवारी तालुका बंदचे आवाहन करताना सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून, सरकारला असहकार करण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे. आळेफाटा, ओतूर, बनकर फाटा, नारायणगाव येथे मराठा समाजाचे कार्यकर्ते सकाळी एकत्र जमून रॅलीने जुन्नरला येणार आहेत. येथे शहरातून रॅली काढून सकाळी 11 वा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत असे हांडे यांनी सांगितले.

Web Title: MarathaKrantiMorcha The administration's cooperation if peace in agitated