#MarathaKrantiMorcha  वाहतूक व्यवस्था सुरु ठेवण्याबाबत निर्णय रात्रीपर्यंत होणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

पुणे : मराठा आंदोलनासाठी उद्या क्रांतीदिनी (ता. 9) महाराष्ट्र बंदची हाक मराठा संघटनांनी दिली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय आणि संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालय सेवा उद्या बंद आहेत. या बंदमुळे वाहतूक व्यवस्थेवर काय परिणाम होणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

रेल्वे सेवा सुरळीत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. एसटी सेवा मराठा संघटनांनी पुकारलेल्या उद्याच्या महाराष्ट्र बंदमुळे सुरू ठेवायची की नाही.यावर आज पाच वाजता विभागीय नियंत्रकांनी आढावा बैठक बोलविली आहे. या बैठकीनंतर उद्या (ता.9) बस सेवा बंद ठेवायची की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे. पीएमपीची सेवा उद्या (ता.9) बंद राहणार की नाही, हे आज सहा वाजता पोलिसांबरोबर होणाऱ्या बैठकी नंतर निर्णय घेतला जाणार आहे. 

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा, महाविद्यालयांसह सार्वजनिक आणि अभिमत विद्यापीठे उद्या (ता.9) बंद राहणार आहेत. पुणे महापालिकेने देखील सर्व प्राथमिक, माध्यमिक महापालिका आणि खाजगी व्यवस्थापणाच्या शाळा उद्या (ता.9) बंद राहणार आहेत. मराठा आरक्षण आंदोलनामुळे महापालिकेच्या शिक्षण विभागाचा निर्णय घेतला आहे. 

Web Title: #MarathaKrantiMorcha The decision to continue the transport system will be taken by night