#MarathaKrantiMorcha मराठा आरक्षणासाठी जुन्नरला बुधवारी बंदची हाक

दत्ता म्हसकर
मंगळवार, 31 जुलै 2018

जुन्नर - मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुधवार ता. 1 ऑगस्ट रोजी 'जुन्नर तालुका बंद'ची हाक मराठा क्रांती मोर्चा, जुन्नरच्या वतीने देण्यात आली. नारायणगाव ता जुन्नर येथे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. या समन्वय बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 

राज्यभर मराठा समाजाने आरक्षणासाठी आंदोलन पुकारले असून शासन मराठा आरक्षणासाठी कोणतेही ठोस पाऊल तातडीने उचलत नसल्याने मराठा समाजाच्या भावनाचा उद्रेक होत आहे. याच उद्रेकातून राज्यातील विविध ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले असून त्याची सर्वस्वी जाबाबदरी शासनाची आहे. शिवजन्मभूमी मधील मराठा समाज बांधवांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुका बंदची हाक देऊन एल्गार पुकारला आहे. यावेळी गावागावातील तलाठी, ग्रामपंचायत यांसह अन्य शासकीय निम शासकीय कार्यालये बंद करण्यात येणार आहेत. शाळा व महाविद्यालये देखील बंद करण्यात येणार आहे. यानिमित्ताने जुन्नर शहरात तालुक्यातील मराठा समाज बांधव एकत्र येऊन रॅली काढून जुन्नर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.  रविवार ता. 5 रोजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार शरद सोनवणे यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन  तर ता.9 रोजी मराठा समाजाचे पुरुष व महिला लहान मुले व जनावरे यांसह रस्त्यावर उतरून महाराष्ट्र बंद मध्ये सहभाग घेणार आहेत.

Web Title: MarathaKrantiMorcha junnar band on Wednesday