#MarathaKrantiMorcha पुण्यात मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

एक मराठा, लाख मराठा, शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे, समाजाला आरक्षण मिळेल पाहिजे, मागे घ्या मागे घ्या खोट्या केसेस मागे घ्या, फडणवीस चले जाव अशा घोषणा यावेळी देण्यात आला. 

पुणे : मराठा आरक्षण व मराठा क्रांती मोर्चातील अांदोलकांवरील गंभीर गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी, तसेच गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी आज (रविवार) सकाळी पुण्यात मराठा क्रांती मोर्चा व ठिय्या अांदोलनाचे आयोजन करण्यात आले.

डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून शिवाजीनगरच्या एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली होती. 

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरवात झाली. एक मराठा, लाख मराठा, शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे, समाजाला आरक्षण मिळेल पाहिजे, मागे घ्या मागे घ्या खोट्या केसेस मागे घ्या, फडणवीस चले जाव अशा घोषणा यावेळी देण्यात आला. भगवे मफलर आणि भगवे झेंडे हातात घेऊन मोठ्या संख्येने मराठा बांधव मार्चात सहभागी झाले होते.

Web Title: MarathaKrantiMorcha in Pune