#MarathaKrantiMorcha सकल मराठा समाजाचा माळवाडीत रास्ता रोको

malwadi.
malwadi.

तळेगाव स्टेशन - मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे मावळ तालुक्यातील माळवाडी येथे तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोनाद्वारे रास्ता रोको करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चातर्फे उद्या गुरुवारी (ता.२५) मावळ बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलना दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावे,या मागणीसाठी कायगाव टोका येथे एका तरुणाने पुलावरुनगोदावरीत जलसमाधी घेतल्याच्या घटनेनंतर त्याचे पडसाद मावळा तालुक्यातही उमटायला सुरवात झाली आहे. माळवाडी सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी मावळच्या नायब तहसिदार आणि एमआयडीसी पोलीस निरीक्षकांना आंदोलनासंदर्भात निवेदन देण्यात आले. त्यानंतर माळवाडी येथे आज बुधवारी (ता.२५) सकाळी सव्वा अकराला छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने भगवे झेंडे हातात धरुन घोषणा देत, तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केले. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे आणि मराठा मोर्चातील इतर मागण्यांचा यावेळी पुनरुच्चार करण्यात आला.रास्ता रोकोनंतर गावातून फेरी काढण्यात आली. शेवटी कानिफनाथ मंदिरात झालेल्या सभेत मराठा आरक्षणाच्या लढ्यात हुतात्मा झालेले काकासाहेब शिंदे, जगन्नाथ सोनवणे यांना श्रद्धांजली वाहून आंदोलन विसर्जित करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चातर्फे गुरुवारी पुकारलेल्या मावळ बंदमध्ये माळवाडी देखील कडेकोट बंद राहणार असलायची घोषणा यावेळी करण्यात आली. आंदोलन शांतता मार्गाने पार पडले. आंदोलनामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एमआयडीसी पोलीसांनी बंदोबस्त ठेवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com