#MarathaKrantiMorcha उंडवडी कडेपठार येथे रस्ता रोको आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

उंडवडी (बारामती) - मराठा समाजाला आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आज (ता. 25) सकाळी साडे आठ वाजता उंडवडी कडेपठार येथे सकल मराठा समाजाने बारामती - पाटस रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करुन एक तासाहून अधिक वेळ रस्ता अडवून धरला. त्यामुळे बारामती - पाटस रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच- लांब रांगा लागल्या होत्या.    

यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर पेटवून दिले व ठिय्या मांडून घोषणाबाजी केली. यामध्ये परिसरातील गावागावांतील सकल मराठा बांधव व कार्यकर्ते दाखल झाले होते. 

सकल मराठा समाजाच्या वतीने काकासाहेब शिंदे या तरुणाला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे व मंडल अधिकारी एम. पी. सय्यद यांना आपल्या मांगण्याचे निवेदन मराठा समाजाच्या वतीने  देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत करुन दिली

Web Title: MarathaKrantiMorcha Road Stop movement at Undvadi Kadepathar road