मराठा आरक्षणावरून पुणे महापालिकेत तोडफोड (व्हिडिओ)

Pune
Pune

पुणे : पुणे महापालिकेचे सर्वसाधारण सभा होण्यापूर्वीच शिवसेनेने मराठा आरक्षणासाठी सभागृहात हातात फलक घेऊन घोषणाबाजी करण्यास सुरवात केली. त्यानंतर शिवसेना गटनेते संजय भोसले यांच्याकडून महापौर मुक्ता टिळक यांच्या आसनासमोरील कुंडी व ग्लास फोडण्यात आला. यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला अन् सभागृह तहकूब करण्यात आले.

शिवसेना गटनेते संजय भोसले यांच्यासह शिवसेना नगरसेवकांनी फलक हातात घेऊऩ घोषणाबाजी करण्यास सुरवात केली. त्यानंतर आक्रमक होत भाजप सरकारवर आरोप केले. तेव्हा या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसेचे सदस्य सहभागी झाले. त्यामुळे सभागृहात प्रचंड घोषणाबाजी झाली. तेव्हाच भाजप सदस्यांनाही मराठ्यांना आरक्षण आम्हीच देणार घोषणा देण्यास सुरवात केली. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. महापौर मुक्ता टिळक सभा तहकूबी वाचत असताना शिवसेना गटनेते संजय भोसले हे महापौरांच्या आसनासमोर येऊन तेथील कुंडी आणि ग्लास फोडला. त्यानंतर नाना भानगिरे यांनी महापौरांच्या येथे जाऊन जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरवात केली. त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ झाला.

भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्यासह काही जणांनी भोसले आणि भानगिरे यांना बाजूला केले. या गोंधळातच सभा तहकूब करण्यात आली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com