#MarathaKrantiMorcha बारामतीत ठिय्या आंदोलनास प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

बारामती शहर - मराठा आरक्षणासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने शहरात आठवडाभराच्या ठिय्या आंदोलनास आज प्रारंभ झाला. नगरपालिकेसमोर तीन हत्ती चौकात आज मराठा बांधवांनी सकाळी दहा पासूनच हजेरी लावत या आंदोलनात सहभाग नोंदविला. 

या आंदोलनासाठी पोलिसांनी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांच्यासह राज्य राखीव दलाची तुकडी व मोठ्या प्रमाणावर पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते. 

आज सकाळी दहा वाजल्यापासूनच नगरपालिकेसमोरील मांडवामध्ये मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विविध घटकातील मान्यवर हजेरी लावत होते. दुपारनंतर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जागरण गोंधळ घातला गेला. आजपासून रविवार वगळता (ता. 5) पुढील बुधवारपर्यंत (ता. 8) ठिय्या आंदोलन सुरुच राहणार असल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले. 

शुक्रवारपासून (ता. 3) बारामती तालुक्याच्या विविध भागातील मराठा समाज बांधव या ठिय्या आंदोलनात मोठ्य संख्येने सहभागी होणार आहेत. आज अतिशय शांततेत व शिस्तीमध्ये ठिय्या आंदोलन बारामतीत झाले. 

Web Title: MarathaKrantiMorcha Start of moderate movement in Baramati