#MarathaKrantiMorcha तीन दिवस मी फक्त पुणे-सोलापूर एवढंच फिरतोय..!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

पुणेः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या क्रांती मोर्चाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. त्यामुळे पुण्यातून राज्यभर होणारी एसटीची वाहतूक विस्कळित झाली आहे. वाहतूक ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचा मात्र खोंळबा होत आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले वारकरी देखील बंदमुळे घरी जाऊ शकले ऩाहीत. शिवाजी जाधव हा वारकरी तीन दिवसांपासून घरी परतु शकला नाही. महामार्गावर झालेल्या हिंसक घटनामुळे एसटी वाहतूक ठप्प झाली आहे. 

""आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला आलो होतो. वारीनंतर गावी जाण्यासाठी निघालो. मात्र मार्ग बंद आसल्याने मला कोल्हापूरला जाण्यास सांगण्यात आले. कोल्हापूरला गेल्यावर मला पुण्याला जाण्यास सांगण्यात आले. मागील तीन दिवस पुणे-सोलापूर, सोलापूर-पुणे अशा फेऱ्या मारत आहे. तरी मला घरी जाण्यासाठी पुण्यातून एसटी बस मिळत नाही. एसटीने लवकरात लवकर काही तरी निर्णय घेतला पाहिजे. आंदोलकांनी सांगितले होते, वारकऱ्यांना अडचणी येतील असे कोणतेही कृत्य करण्यात येणार नाही. पण आंदोलकांनी एसटी बसलाही लक्ष केल्याने येथील प्रशासने गाड्या न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्या गोष्टीमुळे मी तीन दिवस घरी जाऊ शकलो नाही.'' 
- शिवाजी जाधव, प्रवासी 
 
Web Title: #MarathaKrantiMorcha varkari are not reach at home from three day