आपण मरण सुखी करण्याच्या मार्गावर : अतुल कुलकर्णी

आपण मरण सुखी करण्याच्या मार्गावर : अतुल कुलकर्णी

पुणे : "आपल्या जगण्याच्या व्याख्या नेहमी दुसऱ्यांनी ठरवल्या आहेत. पर्यावरण ऱ्हासाच्या मुळाशी त्याच व्याख्या आहेत. देशा-देशांतील स्पर्धेमुळे कोणच कोणाचे ऐकत नाही. या सर्वांतून परत येण्याचा मार्ग नाही. त्यामुळे आपण आता कर्करोगाच्या रुग्णासारखे मरण सुखी करण्याच्या मार्गावर आहोत,'' अशी खंत अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केली. 

अतुल देऊळगावकर यांनी लिहिलेल्या "ग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येतेय ना' पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांच्या हस्ते झाले. या वेळी कुलकर्णी बोलते होते. ते म्हणाले, ""नवीन पिढ्यांना अनुकूल असलेले जग आपण मागे काही सोडत नाही. त्यामुळे चूक कबूल करण्याची आता वेळ आली आहे. मनुष्याच्या व्याख्येच्या पुढची पिढी आता निर्माण होत असून, वयाकडे दुर्लक्ष करून त्यांचे म्हणणे ऐकून घेणे गरजेचे आहे.'' 

देऊळगावकर म्हणाले, ""काही देशांमध्ये प्राथमिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून भेदभाव दूर केला जातात. विद्यार्थी आणि शिक्षक पर्यावरणासाठी रस्त्यावर उतरतात. पंधरा वर्षांच्या मुलीच्या भाषणामुळे पर्यावरणविषयक समज वाढला आहे. प्रश्न जागतिक असले, तरी त्याचे उत्तर स्थानिक आहेत. पर्यावरणावर अतिक्रमण ही आपत्तीची पेरणी आहे. हवामानबदल हा विषय सरकारच्या धोरणात कुठेही नाही.'' मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर या वेळी उपस्थित होते. 

लग्न झाले की मूल झाले पाहिजे, हा नियम आता बदलायला हवा. मनुष्याने मुलं जन्माला घालणे बंद करायला पाहिजे. कारण मूल जन्मते त्या वेळी त्याचे उपभोगणे सुरू होते. त्यामुळे मी ठरवून मूल जन्माला घातले नाही. 

- अतुल कुलकर्णी 

वेळ टळली की, उपाय बाजूला पडतात. स्वच्छतागृह नसल्यामुळे झालेल्या आजारांवर नागरिकांचे कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. विकासाला मानवतेचा चेहरा देऊन पर्यावरणाची काळजी घेणे आता गरजेचे झाले आहे. 

- वीणा गवाणकर, ज्येष्ठ लेखिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com