

Subodh Bhave Celebrates 25 Years in Cinema with a Social Mission
Sakal
पुणे : चित्रपटात अभिनयाची २५ वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर अभिनेता सुबोध भावे यांनी महाराष्ट्रातील २५ सामाजिक संस्थांना ‘प्रेमाची भेट’ देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्तुत्य उपक्रमांतर्गत चार संस्थांना मदत केली असून, तळागाळातील मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या डोअर स्टेप स्कूल फाउंडेशनला ‘प्रेमाची भेट’ प्रदान केली.