मानसी नाईकचा विनयभंग करणारा तो व्यक्ती आहे तरी कोण?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

मानसीने मुंबईत साकीनाका पोलिस स्टेशनला आपली तक्रार दाखल केली असून आरोपी हे शिरुर शहरातील वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती साकीनाका पोलिसांनी दिली.

शिक्रापूर : अभिनेत्री मानसी नाईकचा विनयभंग व त्यांच्या आई-वडीलांना जिवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर याबाबत मानसीने मुंबईत साकीनाका पोलिस स्टेशनला आपली तक्रार दाखल केली असून आरोपी हे शिरुर शहरातील वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती साकीनाका पोलिसांनी दिली. या संपूर्ण घटनेला मानसी नाईक यांनी दुजोरा दिला असून देशात प्रसिध्द व कोट्यावधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या महागणपतीच्या गावात असे घडल्याने आपल्याला मोठा मानसिक धक्का बसल्याचेही त्यांनी याबाबत `सकाळ`शी बोलताना सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवसेनेच्या जिल्हा युवासेनेचे पदाधिकारी बापूसाहेब शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य म्हणून भाऊ कदम, कुशल बद्रीके, प्राजक्ता हनमघर आदींसह प्रसिध्द अभिनेत्री मानसी नाईक दोन दिवसांपूर्वी रांजणगावमध्ये आले होते. यावेळी इतर कलाकारांचे सादरीकरण होत असतानाच नाईक यांना हा कार्यक्रमाच्या नियोजनात असलेल्या एका दांपत्याने त्यांना अर्वाच्च भाषेत वागणूक दिली. दरम्यान याच वेळी एका २१ वर्षीय युवकाने त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करुन त्यांना लज्जा उप्तन्न होईल अशी वर्तणूक करताना नाईक यांनी संताप व्यक्त करताच या दांपत्याने त्या युवकाला तेथून पळवून लावले.

पुण्यात मानसी नाईकचा विनयभंग

हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर नाईक यांचे काही व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही त्यांना दिली गेली. या शिवाय नाईक यांच्या वयस्कर आई यांना रात्री बाराच्या सुमारास फोन करुन तुझ्या मुलीला रस्त्यावर आणून मारुन टाकू अशीही धमकी दिल्याची माहिती नाईक यांनी दिली. दरम्यान याबाबत सर्व माहिती संकलीत करुन मुंबई येथील साकीनाका पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आल्याची माहितीही नाईक यांनी दिली.

दरम्यान महाराष्ट्राची मी लाडकी नर्तिका-अभिनेत्री आहे. रांजणगाव हे महागणपतीमुळे खुपच पवित्र असे स्थान राज्यासाठी आहे. या ठिकाणी असा माझ्या सारखीच्या बाबतीत असा प्रकार होणे खुपच क्लेषदायक असल्याचे त्यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले. याबाबत आपण कायदेशीर न्यायासाठी लढत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पुण्यातील गोल्ड जिमला ग्राहक मंचाचा दणका

मुंबईत दाखल, रांजणगावला आज रात्री होईल दाखल
मानसी नाईक यांच्या फिर्यादीनुसार तिघांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून झिरो नंबरने दाखल हे प्रकरण पुढील तपासासाठी रांजणगाव-एमआयडीसी पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्याची प्रक्रीया आज रात्री पूर्ण होईल. दरम्यान याबाबत रांजणगाव पोलिस स्टेशनला अद्याप प्रकरण दाखल नाही. दाखल होताच फिर्यादीतील तक्रारीनुसार गुन्ह्यांचा तपास करण्यात येईल तसेच गुन्ह्यांची व्याप्ती जास्त असेल तर तशी कलमे वाढवून आरोपींना तातडीने अटक केली जाईल अशी माहिती रांजणगाव पोलिसांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi actress manasi naik molestation suspected from medical field

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: