कलेशिवाय आयुष्याची वीणा अधुरी - प्रवीण दवणे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

आजच्या काळात आजीच्या गाण्यांचा बटवा हरवला आहे. मुलांनी बालपणी आपल्यातील विविध कलागुण विकसित करावेत. जीवनामध्ये वाचनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
- प्रवीण दवणे, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन

बालेवाडी - ‘कलागुणांचा समावेश असलेली सरस्वतीची विणा मुलांनी अंगी बाळगावी. कारण कलेशिवाय आयुष्याची विणा पूर्ण होत नाही. यासाठी मनावरचा रेनकोट काढा अन्‌ संवेदनांचा पाऊस पडूद्या. मराठीवर सध्या इतर भाषांचे अतिक्रमण होत आहे. ते थांबविण्यासाठी मातृभाषेचे शिक्षण सक्तीचे करणे गरजेचे आहे,’’ असे प्रतिपादन
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ कवी व गीतकार प्रवीण दवणे यांनी शनिवारी केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बालेवाडी येथे श्री म्हातोबा तुकाराम बालवडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या २९व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था आणि श्री खंडेराय प्रतिष्ठानच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाची सुरुवात विठ्ठल रुक्‍मिणी भजनी मंडळातील महिलांच्या भजनाने झाली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात बालवडकर विद्यालय ते बालेवाडी हाय स्ट्रीटदरम्यान ग्रंथदिंडी काढण्यात आली. मुले-मुली दिंड्या, पताका, तुळशी वृंदावन आणि टाळ घेऊन या दिंडीत सहभागी झाले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi balkumar sahitya sammelan