मराठीला पर्याय म्हणून ‘आयटी’ विषय नको; ‘शिक्षक महासंघा’ची मागणी

‘केवळ भरमसाट शुल्क आकारणी करता यावी, यासाठी राज्यातील बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आय.टी. हा विषय भाषा विषयाला पर्याय म्हणून ठेवला जातो.
Information Technology
Information TechnologySakal

पुणे - ‘केवळ भरमसाट शुल्क (Fee) आकारणी करता यावी, यासाठी राज्यातील बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आय.टी. (IT) हा विषय (Subject) भाषा विषयाला पर्याय म्हणून ठेवला जातो. अधिक गुणदानाचे आमिष दाखवून मराठी भाषेला (Marathi Language) पर्याय म्हणून आय.टी. विषय ठेवण्यात येऊ नये,’’ अशी मागणी मराठी विषय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. सुनील डिसले यांनी राज्य सरकारकडे केली आहे. (Marathi does not Want IT as an alternative Teacher Mahasangh)

शिक्षण संस्था आर्थिक लाभापोटी विद्यार्थ्यांना या विषयाकडे ‘गुणदानात वाढ’ अशी वेगवेगळी आमिषे दाखवून वळवितात. यातून संस्थेचा आर्थिक लाभ होत असल्याने कमी पगारावर आय.टी. विषयाचे शिक्षक उपलब्ध होतात. त्यामुळे दिवसेंदिवस हा विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, मराठी भाषेला पर्याय म्हणून हा विषय ठेवण्यात येऊ नये, अशी आग्रही मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. सुनील डिसले यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

Information Technology
सकाळ इम्पॅक्ट : ऑक्सिजनअभावी बंद पडलेले उद्योग सुरू होणार!

बारावीत दरवर्षी साधारणत: तीन ते साडेतीन लाख विद्यार्थी हा विषय घेतात. हा विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पाच आकडी शैक्षणिक शुल्क असते. मात्र, तरीही केवळ बारावीत गुणांमध्ये वाढ होईल, असे सांगण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांचा हा विषय घेण्याकडे वाढता कल आहे.

- प्रा. सुनील डिसले, अध्यक्ष, मराठी विषय शिक्षक महासंघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com