"आपला देश भगवाच राहिला पाहिजे; तो कधीही हिरवा होता कामा नये" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vikram Gokhale

"आपला देश भगवाच राहिला पाहिजे; तो कधीही हिरवा होता कामा नये"

वारजे : आपला देश भगवाच राहिला पाहिजे. तो कधीही हिरवा होता कामा नये. हिंदू संस्कृती ही सर्वाना एकत्र घेऊन जाण्याची परंपरा आहे. असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यानी कर्वेनगर येथे केले.

हेही वाचा: Naxal Encounter : मिलिंद तेलतुंबडेवरील ५० लाखाचं बक्षीस पोलिसांना मिळणार?

कर्वेनगर येथे दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गोखले बोलत होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले एअर इंडियाला व एसटीला गाळात घाल्याण्याचे काम राजकीय लोकांनी केले आहे. कंगना राणावत जे बोलली त्या विधानाशी मी सहमत आहे. प्रत्येक कामाच्या खर्चाचे ऑडिट झाले पाहिजे. फडतूस कारणामुळे राजकारण होत आहे.

हेही वाचा: NZ vs AUS Final: कोण ठरेल वरचढ? पाहा आकडेवारी काय सांगते...

सेना भाजप आताही एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकते. मीही त्यासाठी फडणीसाची बोललो होतो. अडीच - अडीच वर्ष दोघांनी वाटून घ्यायला पाहिजे होते. आताची सेना ही बाळासाहेबांची सेना राहिली नाही. मतपेटीच्या साठी जातीभेद व तेढ निर्माण करत आहे. 70 वर्षातील जो गाळ साचलेला आहे. तो मोदी साफ करत आहे. त्यामुळे त्यांना वेळ दिला पाहिजे, असेही गोखले यांनी सांगितले.

loading image
go to top