महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर नाही एकही शौचालय... 

संदिप जगदाळे
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

हडपसर (पुणे) : शासन सर्वत्र स्वच्छता अभियान राबवित आहे. मात्र राज्‍य सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या महाराष्ट्रातील 51 किल्ल्यावर एकही शौचालय नसल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. 

हडपसर (पुणे) : शासन सर्वत्र स्वच्छता अभियान राबवित आहे. मात्र राज्‍य सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या महाराष्ट्रातील 51 किल्ल्यावर एकही शौचालय नसल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. 

सामाजिक कार्यकर्ते आदित्य राठी यांनी माहितीच्या अधिकारात मागविलेल्या माहितीतून ही बाब उघड झाली आहे. राजगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत आदित्य राठी गेले होते. त्यांनी जेव्हा गडावर शौचासाठी शौचालय शोधले तेव्हा त्यांच्या लक्ष्यात आले की राजगड किल्ल्यावर एकही शौचालय पुरुषांसाठी अथवा महिलांसाठी उपलब्ध नाही. तेव्हा राठी यांनी पुरातत्व विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे माहितीचा अर्ज करून महाराष्ट्रातील किती गडकिल्ल्यांवर शौचालय उपलब्ध आहे आणि त्यात महिलांसाठी आणि पुरुषांसाठी शौचालय किती अशी माहिती माहितीच्या अधिकारात मागविली. पण राठी यांना जे उत्तर पुरातत्व विभागाकडून कडून मिळाले ते पाहून त्यातून ही धक्कादाय बाब उघडकीस आली. 

मिळालेल्या माहिती मध्ये एकही शौचालय पुरातत्व विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या अखत्यारीत येणार्‍या महाराष्ट्रातील 51 गड किल्ल्यावर नाही. राठी म्हणाले" गड किल्ल्यावर शौचालय नसणे हे आपल्या पुरोगामी महाराष्ट्रला न शोभणारे आहे. गड किल्ल्याचे पावित्र्य जपने आपल्याच हातात आहे आणि त्यासाठी गडकिल्ल्यांवर स्वच्छतागृह असणे फार महत्वाचे आहे. म्हणून मी आपले सरकार या संकेतस्थळाच्या माध्यामातून महाराष्ट्रातील गड किल्ल्यावर मोबाईल टॉयलेटची उभारणी करावी अशी मागणी पुरातत्व विभागाकडे केली आहे." गडप्रेमींनी सुद्धा अश्या प्रकारची मागणी पुरातत्व विभागाकडे करावी असे आवाहन राठी यांनी केले आहे.
 

Web Title: Marathi new pune news no toilets on fort