भिगवणमध्ये शंभर टक्के बंदला प्रतिसाद 

प्रशांत चवरे
बुधवार, 3 जानेवारी 2018

भिगवण : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ घोषित करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला भिगवण, मदनवाडी, तक्रारवाडी (ता.इंदापुर) येथे उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता इतर जवळपास सर्वच व्यवसाय शंभर टक्के बंद होते. भिमा कोरेगांव येथील घटनेच्या निषेधार्थ भारीप बहुजन महासंघ, अमर बौध्द संघटना व इतर समविचारी संघटनांच्या वतीने बुधवारी महाराष्ट्र बंदची घोषणा मंगळवारी (ता. ०२) सायंकाळी केली होती व त्याबाबतची पूर्व कल्पना मोबाईल, ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून देण्यात आली होती. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांनी त्या दृष्टीने नियोजन केले होते. बुधवारी (ता.

भिगवण : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ घोषित करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला भिगवण, मदनवाडी, तक्रारवाडी (ता.इंदापुर) येथे उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता इतर जवळपास सर्वच व्यवसाय शंभर टक्के बंद होते. भिमा कोरेगांव येथील घटनेच्या निषेधार्थ भारीप बहुजन महासंघ, अमर बौध्द संघटना व इतर समविचारी संघटनांच्या वतीने बुधवारी महाराष्ट्र बंदची घोषणा मंगळवारी (ता. ०२) सायंकाळी केली होती व त्याबाबतची पूर्व कल्पना मोबाईल, ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून देण्यात आली होती. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांनी त्या दृष्टीने नियोजन केले होते. बुधवारी (ता. ०३) सकाळी मुख्य बाजारपेठ, राष्ट्रीय महामार्गाच्या बाजुचे दुकाने, तक्रारवाडी (ता.इंदापुर) येथील मच्छी मार्केट, मदनवाडी चौफुला, भिगवण बस स्थानक आदी परिसरातील व्यवसाय बंद होते. नेहमी वर्दळ असलेल्या ठिकाणी लोकांची संख्याही तुरळक होती. अत्यावश्यक सेवा वगळता जवळपास शंभर टक्के व्यवसाय बंद होते. बंद पाळून भिमा कोरेगांव येथील घटनेचा निषेध समविचारी संघटनांच्या वतीने करण्यात आला. बंदच्या पार्श्वभुमीवर भिगवण पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. 

 

Web Title: Marathi news bhigwan news strike at bhigwan