महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यास सकारात्मक परिवर्तन घडेल - आ. भरणे

प्रशांत चवरे
सोमवार, 12 मार्च 2018

भिगवण (पुणे) : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची तरतुद करण्यात आली. महिला आरक्षणाच्या निर्णयाचे सकारात्मक परिणाम सध्या दिसु लागले आहेत. महिलांना देण्यात आलेल्या प्रोत्साहनामुळे त्या विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. पुरुषांनीही महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यास समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन होण्यास मदत होईल असा विश्वास इंदापुरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.

येथील ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक महिना दिनाच्या निमित्ताने खाऊ गल्ली व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास सारिका भरणे, जिल्हा परिषद सदस्या वैशाली पाटील, हनुमंत बंडगर, प्रताप पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक वणवे, शंकरराव गायकवाड, आबासाहेब देवकाते, सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड, सचिन बोगावत, सरपंच हेमाताई माडगे, उपसरपंच प्रदीप वाकसे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सारिका भरणे म्हणाल्या, महिलांनी राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई, सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. चुल व मुल यांमध्ये अडकुन राहिलेल्या महिलांना संधी दिल्या त्या कशा प्रकारे उल्लेखनीय कामगिरी करु शकतात यांचे उत्तम उदाहरण खाऊ गल्ली आहे. या उपक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निमार्ण होण्यास मदत होईल. 

यावेळी ऋतुजा कांबळे, शिल्पा कांबळे, आम्रपाली बंडगर, अल्का रायसोनी, वर्षा बोगावत, डॉ. पद्ममा खरड, अॅड. स्वाती गिरंजे, प्रा. माया झोळ, सारिका बंडगर, संध्या हारनोळ, अंजना हेळकर यांचा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी वर्षा बोगावत, अॅड. स्वाती गिरंजे, माया झोळ, अंजना हेळकर, सारिकां बंडगर, वैशाली पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कायर्क्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन गणेश राक्षे यांनी केले तर आभार सरपंच हेमाताई माडगे यांनी मानले.

खाऊ गल्लीमध्ये महिलांनी विविध पदार्थांचे 40 स्ट़ॉल्स उभारले होते. भिगवण तक्रारवाडी व मदनवाडी (ता.इंदापुर) येथील महिला व बालकांनी खाऊ गल्लीच्या उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्यामुळे खाऊ गल्लीमध्ये मोठी गर्दी झाली होती. खाऊ गल्लीमध्ये बियार्णी व मच्छीं, पाणी पुरी, वडा पाव, धपा़टे व  गावराण पदार्थ तसेच तरुण खवय्यांना भुरळ घालणारे चाईनीस व आईसक्रिमचे स्टॉल्स लावण्यात आले होते. खवय्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे सुमारे चार लाख रुपयांपर्यत उलाढाल झाल्याचे सरपंच हेमा माडगे यांनी सांगितले. या उपक्रमासाठी सरपंच हेमाताई माडगे व उपसरपंच प्रदीप वाकसे व अनिता धवडे, अश्विनी शेंडगे, वंदना शेलार, रेखा पाचांगणे, ललिता वाकसे, संगिता शेलार, लता चोपडे, ललिता जाडकर, सविता राक्षे आदींनी विशेष परिश्रम घेतले.  

Web Title: Marathi news bhigwan news womens day