सत्तेनंतरचे आमचे एक वर्ष वाया - गोगावले 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

पुणे - शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सर्व घटकांची जबाबदारी असून, महापालिकेत सत्ता मिळविल्यानंतरचे आमचे एक वर्ष वाया गेले, अशी कबुली भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी येथे दिली. त्याच वेळी प्रशासकीय मांडणी आणि कार्यपद्धतीवर त्यांनी टीका केली. 

सजग नागरिक मंच आणि पीएमपी प्रवासी मंचतर्फे आयोजित कार्यक्रमात गोगावले बोलत होते. पीएमपीने ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पासच्या दरवाढीच्या विरोधातील यशस्वी आंदोलनकर्त्यांचा सत्कार गोगावले यांच्या हस्ते केला. या वेळी विवेक वेलणकर, जुगल राठी, निवृत्त कर्नल बाबूराव चौधरी आदी उपस्थित होते. वाहतूक सुधारणासंदर्भात पीएमपी प्रवासी मंचचे राठी यांनी सादर केलेल्या पंचसूत्री आणि भाजपच्या जाहीरनाम्यातील पाच बीआरटी मार्ग मोफत करण्याची घोषणेचा संदर्भ गोगावले यांनी घेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणेवर आणि महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर  मते मांडली. 

ते म्हणाले, ‘‘बीआरटी मार्गावरील घोषणा ही राजकीय नाही, तर ती वस्तुस्थिती आम्ही आणणार आहोत. त्यासाठी खासगी संस्थांची मदत घेतली जाईल. एका मार्गावर हा प्रयोग यशस्वी ठरला, तर अनेक संस्था मदतीला पुढे येतील, असा विश्‍वास आहे.’’ महापालिका प्रशासनाकडे गोगावले यांनी बोट दाखवत समाविष्ट अकरा गावांतील बांधकामांवर केलेल्या कारवाईचा संदर्भ दिला. कोणतीही माहिती हातात नसताना प्रशासनाने ही कारवाई केली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांविषयी गैरसमज निर्माण होतात, असे ते म्हणाले.

Web Title: marathi news bjp yogesh gogawale pune bjp one year