ब्रिटिश नागरिकांनीही घेतला  मिसळ, वडापावचा आस्वाद 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

पुणे - मिसळ, भेळ, वडापाव, पाणीपुरी, आम्रखंड या अस्सल मराठी खाद्यपदार्थांवर इंग्लंडमधील मंडळींनीही ताव मारला आणि मराठी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. निमित्त होते मराठी खाद्यपदार्थ महोत्सवाचे ! 

लंडनपासून 112 किलोमीटरवर असलेल्या हॅम्पशर कौंटीमधील "साउथ ऑफ इंग्लंड मराठी परिवार' संघटनेने मराठी परंपरेची स्थानिक भारतीयांना आणि ब्रिटिश नागरिकांना माहिती व्हावी, या उद्देशाने मराठी खाद्यपदार्थ महोत्सव आयोजित केला होता. हॅम्पशरमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्ताने स्थायिक झालेल्या मराठी नागरिकांनी त्यासाठी पुढाकार घेतला. 

या महोत्सवात मिसळ, भेळ, वडापाव, पाणीपुरी, आम्रखंड, पुरणपोळी, मसाले भात, मॅंगो मस्तानी आदी खाद्यपदार्थ ठेवले होते. हॅम्पशरपासून जवळपासच्या शहरांतील सर्वच नागरिकांना या महोत्सवासाठी आमंत्रित केले होते. ब्रिटिश नागरिकांनीही आवर्जून उपस्थिती लावून या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. महाराष्ट्रीयन खेळ आणि उपक्रमांचाही यात समावेश होता. मराठमोळ्या वेशात साउथ ऑफ इंग्लंड मराठी परिवाराचे सदस्य महोत्सवासाठी आलेल्यांचे स्वागत करीत होते. 

Web Title: marathi news British citizens misal wadapav Marathi Food Festival