पशुचिकित्सा संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने

पशुचिकित्सा संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने

पुणे : राज्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने तसेच विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जात असल्याच्या निषेधार्थ पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या वतीने राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर शनिवारी (ता. 16 ) निदर्शने करण्यात येणार आहे. 

संघटनेच्या पुणे शाखेच्या वतीनेही जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन करण्यात येणार आहे. संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष डॉ. श्रीधर ठाकरे, सचिव डॉ. मोहन सुर्यवंशी, कोषाध्यक्ष डॉ. काशिनाथ लाड, डॉ. सुर्यकांत विपट, डॉ. सुनिल मुळीक, मुख्यालय सहसचिव डॉ. विठ्ठल चामरे यांच्या नेतृत्वाखाली हे निदर्शन होणार आहे. 
जनावरांना टेगिंग करून ऑनलाईन नोंदणीसाठी संगणक व इंटरनेट जोडणी मिळणे, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व पशुधन विकास अधिकारी यांची प्रलंबीत पदोन्नती करणे, कालबध्द पदोन्नतीची प्रलंबीत प्रकरणे निकाली काढणे, रिक्त असलेली पशुधन पर्यवेक्षकांची भरती करणे, संवर्गातील कर्मचाऱ्यांना वेतनातून दरमहा कायम प्रवासभत्ता देणे. आदी मागण्या संघटनेनी केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com