एकवीरा देवीच्या मंदिरास खासदार बारणेंकडून कळस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

लोणावळा - वेहेरगाव, कार्ला येथील एकवीरा देवी मंदिराचा कळस चोरीच्या पार्श्वभूमीवर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या वतीने एकवीरा देवीच्या मंदिरास नवीन कळस अर्पण करण्यात आला. 

लोणावळा - वेहेरगाव, कार्ला येथील एकवीरा देवी मंदिराचा कळस चोरीच्या पार्श्वभूमीवर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या वतीने एकवीरा देवीच्या मंदिरास नवीन कळस अर्पण करण्यात आला. 

सहायक धर्मादाय आयुक्तांनी मंदिराचा कळस बसविण्याच्या सूचना दिल्या होत्या. खासदार बारणे यांनी चिंचवड येथील सोनिगिरा ज्वेलर्सचे मालक दिलीप सोनिगरा यांच्याकडून हा कळस तयार करून घेतला. मंगळवारी (ता.6) बारणे यांचे चिरंजीव प्रताप बारणे यांच्या हस्ते तो मंदिर समितीकडे सुपूर्द करीत देवीच्या चरणी अर्पण केला. या वेळी शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडभोर, उपतालुका प्रमुख सुरेश गायकवाड, अंकुश देशमुख, माऊली घोगरे, अशोक म्हाळसकर, बाळासाहेब हुलावळे आदी उपस्थित होते. 

असंख्य कोळी आणि आगरी भाविकांचे श्रद्धास्थान, तसेच ठाकरे कुटुंबीयांचे कुलदैवत असलेल्या आई एकविरा देवीच्या मंदिराचा कळस अज्ञात चोरट्यांनी काही महिन्यांपूर्वी लंपास केला होता. चोरीनंतर वेहेरगाव ग्रामस्त व मंदिर देवस्थान यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. त्या वेळी मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी एकवीरा देवीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरास नवीन कळस बसविण्याची घोषणा केली होती. लोकसभेचे अधिवेशन असल्याने खासदार श्रीरंग बारणे दिल्लीत असल्यामुळे ते मंगळवारी उपस्थित राहू शकले नाहीत. सदर कळस एकवीरा देवस्थानकडे सुपूर्द करीत असल्याची कल्पना मंदिर समिती अध्यक्ष अनंत तरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिल्याची प्रतिक्रिया खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. 

Web Title: marathi news ekveera devi lonvala Shrirang Barane