एम्प्रेस उद्यानात फुलणार पुष्प प्रदर्शन

संदीप जगदाळे
मंगळवार, 23 जानेवारी 2018

हडपसर - एम्प्रेस उद्यानात पुष्प प्रदर्शनाची तयारी जोरदार सुरु आहे. या प्रदर्शनात केवळ फुलांचा समावेश न करता निरनिराळ्या प्रकारच्या शोभिवंत झाडांच्या कुंडयांची आकर्षक मांडणी, मनमोहक फुलांची मांडणी, पाने-फुले वापरुन तयार केलेल्या विविध पुष्प रचना लक्ष वेधून घेत आहेत. 25 ते 28 जानेवारी या कालावधीत पुष्प प्रदर्शन आयोजित केले आहे. यंदा प्रदर्शनाचे 21 वे वर्षे आहे. 

पुष्प प्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण असते ते म्हणजे विविध प्रकारच्या पुष्परचना. यंदाच्या वर्षी देखील मोना पिंगळे आणि त्यांच्या सहकारी यांचा जपानी पध्दतीच्या पुष्परचना तसेच सुनिता शिर्के व मंगला राव यांचे बोन्साय वृक्ष पुष्प रसिकांना पाहण्यास मिळणार आहेत. प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शनाच्या निमित्ताने एम्प्रेस गार्डन, पुणे महानगरपालिका व काही उद्यान रचनाकार यांनी तयार केलेल्या उद्यानांच्या प्रतिकृती देखील प्रदर्शन कालावधीत पहावयास मिळतील. 

या वर्षीच्या पुष्प प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी निरनिराळ्या सुमारे ३०० प्रकारची फुलझाडे विविधरंगी पाने असणाऱ्या वनस्पती यांच्या आकर्षक रचना महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशनच्या काही पदाधिकाऱयांनी साकार केलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने बालाजी नर्सरी, कृपा नर्सरी यांचे विशेष योगदान आहे. तसेच या कामी उद्यान रचनाकार डॉ. कृष्णा चव्हाण यांनी मार्गदर्शन केलेले आहे. प्रदर्शनात पपेट शो, जादूचे प्रयोग मुलांसाठी आयोजित करण्यात येणार आहेत. प्रदर्शनात पपेट शो, जादूचे प्रयोग मुलांसाठी आयोजित करण्यात येणार आहेत, महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते 25 जानेवारीस दुपारी 12 वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती एमप्रेस बॅाटॅनिकल गार्डनचे सचिव सुरेश पिंगळे व समन्वयक अनुपमा बर्वे यांनी दिली. 

Web Title: marathi news empress garden flowers exhibition