"एम्प्रेस गार्डन'साठी ऑनलाइन याचिका 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

पुणे - "एम्प्रेस गार्डनची लचकेतोड थांबवा', "उद्यानातील जैवविविधतेचे संवर्धन व्हावे', "एम्प्रेस गार्डन वाचवा, पर्यावरण वाचवा', अशी मते नोंदवीत नेटिझन्स्‌नी सोशल मीडियाच्या साह्याने "एम्प्रेस गार्डन' वाचविण्याची मोहीम हाती घेतली आहे. पर्यावरण आणि एम्प्रेस गार्डनप्रेमींनी ऑनलाइन पिटिशन दाखल केली असून, अधिकाधिक नागरिकांनी लॉग इन करून या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले जात आहे. यात "ऑनलाइन पिटिशन'ला सोमवारी रात्रीपर्यंत जवळपास 17 हजार नागरिकांनी पाठिंबा दर्शविला आहे. 

एम्प्रेस गार्डनच्या साडेदहा एकरांवर सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासाठी बांधकाम करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. उद्यानातील बांधकामासंदर्भात निविदा प्रक्रिया सुरू आहे. मात्र, बांधकामामुळे उद्यानातील जैवविविधता धोक्‍यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर उद्यानाच्या संवर्धनासाठी "www.change.org/p/devendra-fadnavis-save-empress-gardens-pune'' या संकेतस्थळावर "साइन द पिटिशन' या अंतर्गत ऑनलाइन पिटिशन नोंदवून "एम्प्रेस गार्डन वाचवा' ही मोहीम उभारली आहे. 

"पुण्यातील हिरवळ कायम राहावी', "निसर्ग वाचवा, हिरवळ वाचवा', "आगामी पिढीसाठी हिरवाईचे संवर्धन करा', अशा प्रतिक्रिया संकेतस्थळावर नेटिझन्सनी नोंदविल्या आहेत. 

बागेत नवीन बांधकामे आणि इतर वापर नकोच. त्याखेरीज बागेला देखभाल आणि नवीन देशी दुर्मिळ झाडे लावण्यासाठी प्रत्यक्ष मदतीची गरज आहे. काही वर्षांपूर्वी विकसित केलेल्या पाम गार्डनमधील बरीच दुर्मिळ झाडे नष्ट झालीत, इतर काही वाईट अवस्थेत आहेत. विकास न झाल्यास इतर वापर करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. 
- श्रीकांत इंगळहळ्ळीकर, वनस्पती अभ्यासक 

आंतरराष्ट्रीय दर्जाचे वनस्पती उद्यान उभारा 
एम्प्रेस गार्डनबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांची भेट घेऊन चर्चा केली. उद्यानात बांधकाम करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शविण्यात आला. या वेळी मनसेचे सचिव योगेश खैरे, संतोष पाटील, मनसे पर्यावरण शहराध्यक्ष संजय भोसले उपस्थित होते. उद्यानात सरकारी अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान उभारण्याचा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. तसेच, या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे वनस्पती उद्यान उभारण्याचा प्रस्ताव मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना दिला.

Web Title: marathi news empress garden Online petition