चिंचवडमधील आगीत तीन दुकाने जळून खाक

संदीप घिसे 
बुधवार, 14 मार्च 2018

पिंपरी  - शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन दुकाने जळून खाक झाली. ही घटना   वाल्हेकरवाडी येथे मंगळवारी (ता.१३) रात्री घडली.

मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी येथील भंगाराच्या दुकानाला आग लागल्याची माहिती संतोष चव्हाण या नागरिकांनी रात्री ११.०५ वाजता अग्निशामक दलास दिली.

 आगीची माहिती मिळताच प्राधिकरण, रहाटणी आणि संत तुकारामनगर अग्निशामक मुख्यालयातून प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाला. दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलास यश आले. 

  मात्र तोपर्यंत भंगाराचे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले होते. तर बाजूला असलेले गॅरेज व फॅब्रिकेशनच्या दुकानालाही मोठ्या प्रमाणात झळ बसली. भंगाराचे दुकान विद्युत रोहित्राच्या खाली असल्यामुळे विद्युत रोहित्राला ही या आगीचा मोठा फटका बसला. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही.

Web Title: marathi news fire chinchwad pcmc