रोकेम प्रकल्पांच्या आगीची चौकशी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 मार्च 2018

पुणे - हडपसरमधील रामटेकडी येथील कचरा प्रकल्पाला लागलेल्या आगीच्या घटनेची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या आगीबाबत चौकशी होणार आहे. ही घटना नैसर्गिक आहे की मानवी, याचा तपास करण्यात येणार असून, त्यासाठी अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

दुसरीकडे, उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील हंजर प्रकल्पाला लागलेल्या आगीची आठवण करून देत या घटनेबाबत महापालिकेतील विरोधकांनी संशय व्यक्त केला होता. त्यामुळे रोकेमला आग लावण्यात आल्याची चर्चा होती. या पार्श्‍वभूमीवर आगीची कारणे जाणून घेतली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

रामटेकडी येथील सुमारे साडेसातशे टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला तीन दिवसांपूर्वी भीषण आग लागली.  ही आग प्रकल्पाला नाही तर तेथील ‘एस्कॅव्हेटर’मधील दोषामुळे (जेसीबी) लागल्याचा खुलासा प्रशासनाने केला आहे. त्यानंतर प्रकल्पातील ज्वलनशील पदार्थाला आग लागल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे. परंतु ही आग लावण्यात आल्याचे सांगितले जात असल्याने त्याची चौकशी होणार आहे. फुरसुंगीतील सुमारे एक हजार टन क्षमतेच्या प्रकल्पाला आग लागल्याने तो जळून खाक झाल्याची घटना घडली होती. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविणे अशक्‍य झाल्यानेच आग लावण्यात आल्याचे तेव्हा सांगण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर रोकेमच्या आगीच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे आणि नगरसेवक योगेश ससाणे यांनी केली होती. 

प्रकल्पाला लागलेल्या आगीच्या घटनेची प्राथमिक कारणे जाणून घेतली आहेत. मात्र त्यामागे आणखी काही कारणे आहेत का, याचा तपास करण्यात येत आहे. त्याची चौकशी होईल. मात्र प्रकल्प सुरू करण्याबाबत संबंधित कंपनीशी चर्चा करण्यात येत असून, प्रकल्पाचे काम लवकरच सुरू केले जाईल.
- सुरेश जगताप,  प्रमुख, घनकचरा व व्यवस्थापन विभाग

सुरक्षिततेसाठी तातडीने उपाय
रोकेमला लागलेल्या आगीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सर्वच कचरा प्रक्रिया प्रकल्पांचे ‘सेफ्टी ऑडिट’ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून २५ ते दीडशे टन क्षमतेच्या प्रकल्पांची पाहणी करण्यात येईल. त्यातून अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्यात येतील, असेही घनकचरा व व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले.

Web Title: marathi news fire pune PMC