पीसीपीएनडीटी कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज - अॅड. उज्वल निकम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

हडपसर : काही सोनोग्राफी केंद्रात गैरप्रकार होतात. त्यामुळे पीसीपीएनडीटी कायदा आवश्यक आहे. मात्र या कायदयातील अनेक जाचक अटींमुळे अनेकदा डॅाक्टरांना वेठीस धरले जाते. त्यामुळे या कायदयात ब-याच दुरूस्ती करण्याची गरज आहे. यासाठी डॅाक्टरांनी संघटीत होवून शासन दरबारी या कायद्यात दुरूस्ती करण्याबाबत पुढाकार घेवून पाठपुरावा करण्याची गरज आहे, असे मत अॅड. उज्वल निकम यांनी व्यक्त केले. स्पेसिअलिस्ट डॉक्टर्स अससोसिएशन आयोजित मेडिको लीगल कॉन्फरन्सचे प्रमुख पाहूणे म्हणून निकम बोलत होते.

हडपसर : काही सोनोग्राफी केंद्रात गैरप्रकार होतात. त्यामुळे पीसीपीएनडीटी कायदा आवश्यक आहे. मात्र या कायदयातील अनेक जाचक अटींमुळे अनेकदा डॅाक्टरांना वेठीस धरले जाते. त्यामुळे या कायदयात ब-याच दुरूस्ती करण्याची गरज आहे. यासाठी डॅाक्टरांनी संघटीत होवून शासन दरबारी या कायद्यात दुरूस्ती करण्याबाबत पुढाकार घेवून पाठपुरावा करण्याची गरज आहे, असे मत अॅड. उज्वल निकम यांनी व्यक्त केले. स्पेसिअलिस्ट डॉक्टर्स अससोसिएशन आयोजित मेडिको लीगल कॉन्फरन्सचे प्रमुख पाहूणे म्हणून निकम बोलत होते. याप्रसंगी ससून रूग्णालयाचे अधिषष्ठाता अजय चंदनवाले, पुणे शहर स्पेसिअलिस्ट डॉक्टर्स अससोसिएशनचे अध्यक्ष डॅा. दिलीप माने, डॅा. स्मिता शर्मा, डॉ ललित कपूर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप
देशपांडे, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, स्पेसिअलिस्ट डॉक्टर्स अससोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ एच. साळे, सचिव डॉ अनुराधा जाधव, सहसचिव डॉ चेतन म्हस्के, खजिनदार डॉ विजय पवार, डॉ दीपा पाठक, डॉ अमर शिंदे व शहरातील ४०० स्पेसिअलिस्ट डॅाक्टर या कार्यशाळेस उपस्थित होते. 

अॅड. निकम म्हणाले, डॅाक्टरांवर हल्ले होतात. त्यांचे संरक्षण केवळ कायदयाने होवू शकत नाही. यासाठी डॅाक्टरांनी रूग्णांशी सुसंवाद वाढवून दोघांमधील दरी कमी करण्यासाठी प्रयत्न वाढवायला हवेत. व्यवसायात प्रामाणिकपणा, स्पष्टवक्तेपणा जपायला हवा. रूग्णालयात येणारा रूग्ण व त्यांचे नातेवाईक हल्ला का करतात, याबाबत अत्मपरिक्षण करायला हवे. रूग्णांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. वैद्यकीय व्यवसायातील नितीमूल्यांचे पालन करायला हवे. डॉ माने म्हणाले, पुणे शहरात प्रथमच तज्ञ डॉक्टर्स अससोसिएशन स्थापना झाली. या माध्यमातून डॉक्टर्स व रुग्ण यांच्या हिताचं काम करण्यात येईल. लहान नर्सिंग रूम कमी खर्चात रूग्णांना सेवा उपल्बध करून देतात. मात्र शासनाच्या धोरणामुळे ते बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. छोटी रुग्णालये सुरू राहण्यासाठी विकास आराखड्यात शासनाने शिथिलता आणण्याची गरज आहे. यासाठी स्पेसिअलिस्ट डॉक्टर्स अससोसिएशन प्रयत्नशील राहील.

Web Title: marathi news hadapsar ujjwal nikam doctor conference

टॅग्स