महिलांनी सावित्री, जिजाऊचे विचार आत्मसात करावे - सारिका मोकाशी 

संतोष आटोळे
सोमवार, 29 जानेवारी 2018

शिर्सुफळ - सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर असताना ग्रामीण महिलांनी सुद्धा सर्व क्षेत्रात यशस्वी होणेसाठी सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ व पुण्यशोल्क अहिल्याबाई होळकर आदींचे विचार आत्मसात करावे, असे प्रतिपादन कटफळ ग्रामपंचायतच्या सरपंच सारिका मोकाशी यांनी केले. कटफळ ग्रामपंचायतीच्या वतीने कर्तबगार महिलांचा सत्कार, प्रश्नमंजुषा यावर आधारित होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सारिका मोकाशी बोलत होत्या.

शिर्सुफळ - सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर असताना ग्रामीण महिलांनी सुद्धा सर्व क्षेत्रात यशस्वी होणेसाठी सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ व पुण्यशोल्क अहिल्याबाई होळकर आदींचे विचार आत्मसात करावे, असे प्रतिपादन कटफळ ग्रामपंचायतच्या सरपंच सारिका मोकाशी यांनी केले. कटफळ ग्रामपंचायतीच्या वतीने कर्तबगार महिलांचा सत्कार, प्रश्नमंजुषा यावर आधारित होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सारिका मोकाशी बोलत होत्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्या सुजाता झगडे, कस्तूर कांबळे, रेखा आटोळे, संगीता मोकाशी, संध्या मोरे, कविता लोखंडे, उपसरपंच शरद कांबळे, मुकिंदा मदने, भारत मोकाशी, पृथ्वीराज लाड, मयूर साळुंखे, कांतीलाल आटोळे, जहांगीर तांबोळी व ग्रामसेवक सतीश बोरावके आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी होम मिनिस्टर मधील विजेत्या मिनाक्षी झगडे, पूजा झगडे, संगीता सुतार यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त झाला. त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. होम मिनिस्टर कार्यक्रमाचे सादरीकरण अनिल सावळे पाटील यांनी केले तर सलीम सय्यद यांनी गायन केले. आभार प्रदर्शन भारत मोकाशी यांनी केले. 
 

Web Title: marathi news home minister program sarpanch