तीन जणांच्या मृत्यूनंतरही अवैध व्यवसाय पुन्हा जोरात सुरु  

प्रफुल्ल भंडारी
रविवार, 21 जानेवारी 2018

दौंड - शहरात जुगार आणि सावकारीच्या पैशांवरुन झालेल्या वादातून संशयित मारेकरी व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय शिंदे यांच्यात झालेल्या गोळीबारात तीन जण ठार झाल्यानंतरही राजरोसपणे भरचौकात मटका सुरु आहे. गोळीबार झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच अवैध व्यवसाय पुन्हा जोमाने सुरु झाले आहेत. 
                     
दौंड शहरात १६ जानेवारीला जुगार आणि सावकारी पैशांवरुन झालेल्या वादातून तीन जण गोळीबारात ठार झाल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, अधिक्षक सुवेझ हक व इतर अधिकारी तळ ठोकून असल्याने शहरातील अवैध व्यवसाय बंद होते. तिघांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर देखील खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त १८ जानेवारीपर्यंत तैनात करण्यात आला होता. परंतु पोलिस बंदोबस्त काढण्यात आल्यानंतर मटका, गावठी दारु व गांजा विक्री, पत्त्यांचे क्लब, लॅाजमधील वेश्या व्यवसाय, नदी पात्रातून वाळूचोरी, आदी अवैध व्यवसाय पुन्हा सुरु झाले आहेत. शहरात ज्या मुख्य चौकांमध्ये सलग तीन दिवस अतिरिक्त पोलिस बंदोबस्त होता तेथेच मटका पुन्हा सुरु झाल्याने दौंड पोलिस ठाण्यातील काही जणांचा निर्लज्जपणा त्या निमित्ताने पुन्हा समोर आला आहे.

वरिष्ठ येतील-जातील मात्र आम्ही नाही सुधारणार! 
गोळीबार प्रकरणातला संशयित मारेकरी नाकाबंदीत पकडला गेल्यानंतर आणि शहरातील जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी शहरातून रवाना झाले. मात्र वरिष्ठांची पाठ फिरताच दौंड पोलिस ठाण्यातील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संगनमताने भरचौकात भरदिवसा हे व्यवसाय सुरु झाले आहेत.

Web Title: marathi news illegal Business corrupt police