बिबट्या पिंजऱयात जेरबंद; लोडशेडिंगमुळे वनविभाग हैराण

पराग जगताप
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

उदापूर : डिंगोर, ता. जुन्नर (जि. पुणे) येथे शुक्रवारी रात्री पावणे आठच्या दरम्यान बिबट्या पिंजऱयात जेरबंद झाला, अशी माहीती ओतूर वनविभागाचे वनक्षेत्रपाल सचिन रघतवान यांनी दिली.

डिंगोर येथे पकडलेला बिबट्या मादी जातीचा असुन अंदाजे 5 ते 6 वर्ष वयाचा पूर्ण वाढ झालेला आहे. बिबट्याला डिंगोरे येथील आमले शिवारात बाळु खंडु मंडलिक यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱयात जेरबंद केले. ओतूर वनविभागाच्या कर्मचाऱयांनी जेरबंद बिबट्या माणिकडोहच्या निवारण केंद्रात सुरक्षित पोहचवला आहे.

जुन्नर तालुक्यातील डिंगोरे पिंपळगाव जोगा जिल्हा परिषद गटातील जवळ जवळ सर्वच गावे बिबट प्रवण क्षेत्रात आहे. या गावांमध्ये बिबट्याची मोठी दहशत आहे. दिवसाढवळ्याही मोठ्या प्रमाणात बिबट्याचे दर्शन डिंगोरे व परिसरात होते.

बिबट प्रवण क्षेत्र असुनही महावितरण कंपनीने या भागात मोठ्या प्रमाणात लोंडशेडिंग चालू केले आहे. हे लोड शेडिंग बंद व्हावे म्हणुन ओतूर वनविभागाने संबधीत सर्वांशी पत्रव्यवहार चालु केला आहे.

लोंडशेडिग बंद न केल्यास वीज वितरण कंपनीविरुध्द तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले व माजी जिल्हा परिषद सदस्य बबन तांबे यांनी दिला असुन बिबट प्रवण क्षेत्रातील गावांमधील लोकांचे जीव गेल्यावरच लोंडशेडिंग बंद कारणार का, अशी तीव्र भावना शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Marathi news Junnar leopard forest department load shedding