ग्रामसभेत होणार शेतकर्‍यांची नोंदणी, ई-नाम योजनेबाबत जनजागरण

दत्ता म्हसकर 
गुरुवार, 25 जानेवारी 2018

जुन्नर : 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार्‍या ग्रामसभेमध्ये ई-नाम योजनेबाबत जनजागृती करण्यात येणार असून याच सभेत शेतकर्‍यांची ई-नाम पोर्टलवर नोंदणी करुन घेतली जाणार आहे. शेतकर्‍यांनी या ग्रामसभेत सहभागी होऊन योजनेची माहिती घ्यावी व आपले नाव नोंदवून घ्यावे असे आवाहन जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. अॅड. संजय काळे, उपसभापती दिलीप  डुंबरे व सचिव चेतन रुकारी यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) योजनेअंतर्गत राज्यातील 60 कृषी उत्पन्न बाजार समित्यांची दोन टप्प्यात निवड झाली आहे. ई-नाम योजनेच्या कार्यप्रणालीप्रमाणे बाजार समितीमध्ये आलेल्या सर्व शेतमालाची ई-नाम पोट्रलवर लॉट मॅनजमेंट, गेट एन्ट्री, शेतमालाची गुणवत्ता तपासणी, ई-ऑक्शन, शेतमालाच्या वजनाची नोंद, ऑनलाईन पेमेंट व आगाऊ गेट एन्ट्री याप्रमाणे ऑनलाईन कामकाज होणे अपेक्षित आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागातून शेतकरी बाजार समितीमध्ये येतात. यासाठी शेतकर्‍यांना या योजनेचे फायदे माहित होणे आवश्यक आहे. 

या योजनेसंदर्भात मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केंद्र व राज्य शासनाच्या अधिकार्‍यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत योजनेस गती देण्यासाठी सूचना करण्यात आल्या. त्याचाच एक भाग म्हणून 26 जानेवारीला कृषी उत्पन्न बाजार समिती व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचे मार्फत कार्यक्षेत्रातील काही गावामधील ग्रामसभा मध्ये योजनेचा प्रचार करुन शेतकर्‍यांची नोंदणी केली जाणार आहे. याच सभेमध्ये योजनेचे फायदे सांगितले जाणार आहेत. 

या ग्रामसभेत जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, डीएमआयचे अधिकारी, संबंधित मंडी ऍनालिस्ट व सेवा पुरवठाधार नागार्जून फर्टिलायर्झस यांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. सभेच्या ठिकाणी ई-नाम डेक्स तयार करुन शेतकर्‍यांची बँक माहितीसह पोर्टलवर नोंदणी केली जाणार आहे. शेतकर्‍यांनी माहितीसह या ग्रामसभेस उपस्थित रहावे आणि योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन जुन्नर कृषि उत्पन्न बाजार समितीने केले आहे.

Web Title: Marathi news junnar news e naam