वैयक्तिक लाभाच्या योजनांपासून सामान्य लाभार्थी वंचित राहण्याची भीती

दत्ता म्हसकर
मंगळवार, 13 मार्च 2018

जुन्नर (पुणे) : पंचायत समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या वैयक्तीक लाभाच्या योजनांपासून सर्व सामान्य लाभार्थी यावर्षी वंचित राहण्याची भीती सामाजिक कार्यकर्ते किरण म्हसकर यांनी व्यक्त केली आहे.                      

जुन्नर (पुणे) : पंचायत समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या वैयक्तीक लाभाच्या योजनांपासून सर्व सामान्य लाभार्थी यावर्षी वंचित राहण्याची भीती सामाजिक कार्यकर्ते किरण म्हसकर यांनी व्यक्त केली आहे.                      

आदिवासी समाजासाठी असणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये शेळी गट, दोन दुभती जनावरे, कडबाकुट्टी, कोंबडीपालन, पाईप, विद्युत मोटार संच अशा विविध योजनांचा समावेश आहे. या विविध योजनेसाठी लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष ठरवून दिलेले आहेत परंतु यावर्षी हे निकष डावलण्यात आले असल्याची चर्चा आहे. लाभार्थी यादी गुप्त ठेवण्यात आली असल्याने संशयाच्या भोवऱ्यात अडकली असून काही बोगस लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काही लाभार्थ्यांच्या  घरातील लोक  शासकीय सेवेत तसेच ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच असल्याचे समजते. त्यांचे रेशन कार्ड एकत्र असताना देखील त्यांना योजनेचे खरे व गरजू लाभार्थी म्हणून निवडून त्यांना योजनेचा लाभ देण्याचे घाटले गेले आहे असेही त्यांनी सांगितले.

काही नेते मंडळींनी आपला दांडगा वशिला लावून ७५% लाभार्थी आपल्याच घरातील लोक, नातेवाईक, कार्यकर्ते पात्र लाभार्थी कसे ठरतील याकडे लक्ष पुरविले आहे. सर्व सामान्य लोक मात्र आपले नाव यादीत केव्हा येईल व आपल्याला योजनेचे लाभ कधी मिळेल याकडे डोळे लावून बसले आहेत.

लाभार्थींच्या याद्या प्रसिध्द न करता अधिकाऱ्यांच्या डायरीत ही नावे लिहून ठेवली गेली असल्याचे किरण म्हसकर यांच्या निदर्शनास आले असल्याने याबाबत माहिती अधिकाराचा उपयोग करून यादी मागविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: Marathi news junnar news government schemes common man aside