'सकाळ'चे ज्येष्ठ बातमीदार दत्ता म्हसकर यांना 'शिवनेरी भूषण पुरस्कार' जाहीर

पराग जगताप
रविवार, 28 जानेवारी 2018

ओतूर : (जुन्नर) : यंदाच्या वर्षातील पत्रकारितेतील 'शिवनेरी भूषण पुरस्कार' 'सकाळ'चे ज्येष्ठ बातमीदार दत्ता म्हसकर यांना जाहीर करण्यात आला. 

पुढील महिन्यात 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने किल्ले शिवनेरी परिसर विकास मंडळाच्या वतीने देण्यात येणारा सन २०१७ - १८ चा पत्रकारिता क्षेत्रातील 'शिवनेरी भूषण पुरस्कार' म्हसकर यांना दिला जाणार आहे. याशिवाय इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कारार्थीची नावेही आमदार शरद सोनावणे यांनी जाहीर केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवजयंतीच्या सोहळ्यात या सर्व पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सोनवणे यांनी दिली. या पुरस्काराचे स्वरूप 11 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रशिस्तीपत्र, शाल व श्रीफळ असे आहे.

यंदाचा 'शिवनेरी भूषण पुरस्कार' दत्ता म्हसकर, बाजीराव दांगट, प्रकाश खांडगे, अनिलतात्या मेहेर, माऊली वाबळे, केरुशेठ वेठेकर, महादेव वाघ, वैभव गायकवाड यांना तर मरणोत्तर शिवनेरी भूषण पुरस्कार निवृत्तीशेठ शेरकर, शिवाजीराव काळे, विलास तांबे यांना जाहीर करण्यात आला.      

मागील वर्षी आचारसंहिता असल्यामुळे भरत अवचट,राजश्री बोरकर, सुंदरताई कुऱ्हाडे, तात्यासाहेब गुंजाळ, विष्णूपंत महाराज ढमाले, गणेश वाळूंज, मुरलीधर काळे, जे.एल.वाबळे यांना तर प्रमोद महाबरे यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला. मात्र, याचे वितरण झाले नाही. यंदा हे सर्व पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

Web Title: Marathi News Junnar news sakals reporter datta mhaskar will get shivneri bhushan award